दोन लाख एटीएममध्ये करावे लागतील बदल!

वृत्तसंस्था
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयानंतर सरकारने पाचशे आणि दोन हजारच्या नव्या नोटा बाजारात आणल्या आहेत. मात्र नव्या नोटांचा आकार लहान असल्याने एटीएममध्ये आवश्‍यक ते तांत्रिक बदल करणे आवश्‍यक आहे. हे बदल करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येत्या 2-3 आठवड्यात परिस्थिती पूर्ववत होईल, अशी माहिती दिली आहे. मात्र एटीएममध्ये तांत्रिक बदल करण्यासाठी त्यापेक्षा अधिक कालवधी लागण्याची शक्‍यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

चलनात नव्याने आलेल्या पाचशे आणि दोन हजारच्या नोटांचा आकार हा रद्द करण्यात आलेल्या 500 आणि 1000 च्या नोटांपेक्षा वेगळा आहे. एटीएम मशिनमधील ज्या भागात नोटा साठविल्या जातात तो भाग बदलावा लागणार आहे. त्या भागाला "कॅसेट ट्रे' म्हटले जाते. सध्या देशात दोन लाखांहून अधिक एटीएम्स कार्यान्वित आहेत. प्रत्येक एटीएममध्ये तीन "कॅसेट ट्रे' असतात. त्यामुळे प्रत्येक एटीएममध्ये असा तांत्रिक बदल करणे अनिवार्य आहे. यासाठी सर्व बॅंकांना मिळून 1 हजार 593 कोटी रुपयांचा खर्च येईल, असा अंदाज आहे. तर या प्रक्रियेला किमान महिन्याभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे जेटली यांच्या म्हणण्याप्रमाणे 2-3 आठवड्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Technical changes needed in ATM machines