तेजस नेटवर्क्सचा आयपीओ उद्यापासून खुला

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

मुंबई: दूरसंचार उपकरणांची निर्मिती करणाऱ्या तेजस नेटवर्क्सच्या प्रारंभिक समभाग विक्रीला(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) उद्या(ता. 14) सुरुवात होत आहे. यानंतर पुढे दोन दिवस चालणाऱ्या योजनेदरम्यान शेअर खरेदीसाठी कंपनीने प्रतिशेअर 250 ते 257 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे.

प्रस्तावित योजनेत कंपनी सुमारे 450 कोटी रुपयांच्या नव्या शेअर्सची विक्री करणार आहे. याशिवाय, विद्यमान भागधारकांच्या 1.27 कोटी शेअर्सची विक्री करण्यासाठी 'ऑफर फॉर सेल' होईल. गुंतवणूकदारांना कमीत कमी 55 शेअर्स खरेदी करावे लागतील. अधिक शेअर्स खरेदी करावयाचे असल्यास तो आकडा 55 च्या पटीत असायला हवा.

आयपीओ योजनेतून मिळणारे भांडवल विकास व संशोधन मंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन, खेळत्या भांडवलाची तरतूद आणि इतर जनरल कॉर्पोरेट कारणांसाठी वापरण्यात येणार आहे.

तेजस नेटवर्क्स ही ऑप्टिकल आणि डेटा नेटवर्किंग उत्पादनांची निर्मिती करणारी कंपनी आहे. कंपनीचा व्यवसाय सुमारे 60 देशांमध्ये विस्तारलेला असून दूरसंचार, इंटरनेट, युटिलिटी, डिफेन्स क्षेत्रातील अनेक कंपन्या तेजस नेटवर्कच्या ग्राहक आहेत.

Web Title: Tejas Networks Limited IPO