प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा हप्ता भरण्यास ३१ जुलैपर्यंत मुदत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 जून 2017

नांदेड: राज्यात खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात भात, खरीप ज्वारी, तीळ, मूग, उडीद, तूर, सोयाबीन व कापूस या पिकांसाठी ही योजना लागू आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा उतरवण्याची अंतिम मुदत सोमवार ता. ३१ जुलैपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन नांदेडच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी दोन टक्के व कापसासाठी पाच टक्के ठेवण्यात आला आहे. जोखीम स्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के निश्चित केला आहे. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्री वादळ, पूर, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणी पश्चात नुकसान इत्यादी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एेच्छिक आहे. जिल्हयात खरीप हंगाम २०१७ मध्ये ही योजना भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड नवीन स्टॉक एक्सेंज बिल्डिंग, २० वा मजला, दलाल स्ट्रीट, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता पुढीलप्रमाणे ः
पीक विमा - संरक्षित रक्कम रु./हेक्टर - शेतकऱ्यांनी भरावयाचा पीकविमा हप्ता (रु.)
१) भात - ३९ हजार रुपये - ७८० रुपये
२) खरीप ज्वारी - २४ हजार - ४८०
३) तूर - ३० हजार - ६००
४) मूग - १८ हजार - ३६०
५) उडीद - १८ हजार - ३६०
६) सोयाबीन - ४० हजार - ८००
७) तीळ - २२ हजार - ४४०
८) कापूस - ४० हजार - २०००

Web Title: Term of the Prime Minister's Peugeot Scheme till July 31