या 5 शहरांत रोज बदलणार पेट्रोल, डिझेलचे दर

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

ही योजना संपूर्ण देशभरात राबविताना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी हा प्रयोग करण्यात येत आहे. 

अर्थविषयक बातम्यांसाठी वाचा : www.sakalmoney.com

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दररोज बदल करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यापूर्वी ती देशातील पाच शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविली जाणार आहे. येत्या 1 मे पासून पुदुचेरी, विशाखापट्टणम, उदयपूर, जमशेदपूर आणि चंडीगड या शहरांमध्ये दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्याचे तेल कंपन्यांनी ठरविले आहे. 

केंद्र सरकारने पेट्रोलचे दर नियंत्रणमुक्त केल्यानंतर 'इंडियन ऑइल कॉर्पोरेशन', 'भारत पेट्रोलियम लिमिटेड' आणि 'हिंदुस्थान पेट्रोलियम' या सरकारी तेल कंपन्या सर्वसंमतीने दर पंधरा दिवसांनी पेट्रोलचे दर निश्‍चित करतात. 

जागतिक पातळीवर सध्या होणार्‍या घडामोडी आणि त्यांचा कच्च्या तेलाच्या किंमतीवर होणारा परिणाम यामुळे आता या दरांमध्ये दररोज बदल करण्याचा कंपन्यांचा विचार आहे. ही योजना संपूर्ण देशभरात राबविताना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी हा प्रयोग करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 

Web Title: these five cities to change petrol, diesel prices everyday