एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यावर मर्यादा

वृत्तसंस्था
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली: डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय स्टेट बॅंकेने क्‍लासिक आणि मेस्ट्रो डेबिट कार्डधारकांची 'एटीएम'मधून पैसे काढण्याची मर्यादा निम्म्याने कमी केली आहे. त्याची आजपासून (बुधवार) अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे 31 ऑक्टोबरपासून एसबीआयच्या एटीएममधून 20 हजारांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही, असे बँकेने जाहीर केले आहे. 

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर हा नियमलागू केल्याने विशेषतः ग्रामीण भागातील खातेधारकांना / नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. आतापर्यंत एसबीआयच्या एटीएम मधून दिवसाला 40 हजार रुपये एवढी रक्कम काढण्याची परवानगी होती. आजपासून ती 20 हजारांवर आणली आहे. होती. एसबीआयच्या या निर्णयामुळे बँकेच्या सुमारे 1.42 कोटी खातेदारांवर परिणाम होणार आहे.

एटीएममधून पैसे काढताना होणाऱ्या फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी रोकड काढण्यावर निर्बंध लावण्याचा निर्णय बॅंकेने घेतला आहे. एसबीआयचे बहुतांश खातेदार दररोज 20 हजारांपेक्षा अधिक रक्कम काढत नाहीत. मात्र व्यापारी देवघेवीसाठी काही जण एटीएममधून दररोज 40 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढत आहेत. यामुळे एटीएमजवळ रक्कम काढताना फसवणूक होण्याच्या तक्रारी मिळत आहेत, असे एसबीआयने म्हटले आहे. तसेच कॅशलेस / डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठीही हा निर्णय घेण्यात आला आहे.

एसबीआयच्या क्लासिक आणि माएस्ट्रो डेबिट कार्डधारकांवर हे निर्बंध लागू होणार आहेत. यापुढे ज्यांना दररोज 20 हजारांपेक्षा अधिक रक्कम काढायची आहे, त्यांना हाय वेरियंट डेबिट कार्डसाठी अर्ज करावा लागणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These SBI customers can't withdraw more than Rs 20000 day