जीएसटीनंतर ‘ही’ वाहने होणार स्वस्त!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 जून 2017

मुंबई: वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर वाहन खरेदी स्वस्त होणार आहे. देशभरात उद्यापासून(ता. 1) ऐतिहासिक वस्तू व सेवा कर(जीएसटी) प्रणाली लागू होत आहे. त्यानंतर, सर्व सेवा आणि वस्तूंवरील करात बदल होणार आहे.

मुंबई: वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर वाहन खरेदी स्वस्त होणार आहे. देशभरात उद्यापासून(ता. 1) ऐतिहासिक वस्तू व सेवा कर(जीएसटी) प्रणाली लागू होत आहे. त्यानंतर, सर्व सेवा आणि वस्तूंवरील करात बदल होणार आहे.

ऑल्टो, स्विफ्ट, डिझायर, आय20 एलिटसारख्या लहान मोटारींच्या किंमतीत किमान 6,500 रुपयांपासून 15,000 रुपयांची घट होईल. लहान मोटारींवर जीएसटीअंतर्गत 29 टक्के कर आकारण्यात येणार आहे. याआधी लहान मोटारींवर 31.4 टक्के कर भरावा लागत. यापुढे, मिड-साईझ सेडान मोटारींच्या किंमती साडेतीन टक्क्यांनी कमी होतील. तुमची लाडकी होंडा सिटी, मारुती सियाझ आणि ह्युंदाई वेरना या मोटारी 30,000 रुपयांनी स्वस्त होतील.

जीएसटीचा सर्वात मोठा फायदा लक्झरी मोटारींना होणार आहे. मर्सिडीज बेंझ, बीएमडब्लू, ऑडी आणि जॅग्वार लँड रोव्हर वाहनांच्या किंमती सुमारे सव्वा लाख रुपयांपासून ते तब्बल सात लाख रुपयांनी कमी होण्याचा अंदाज आहे. जीएसटीमुळे एसयुव्ही वाहनांच्या किंमती सर्वाधिक कमी होणार आहेत. एसयुव्ही वाहनांवर लागणारा कर जीएसटीनंतर 55.3 टक्क्यांवरुन 43 टक्क्यांवर येणार आहे.

याऊलट, जीएसटीनंतर हायब्रिड मोटारींवरील कर 30.3 टक्क्यांवरुन 43 टक्क्यांवर जाणार आहे. भारतात बीएमडब्लूसारख्या हायब्रिड मोटारींचा वापर दुर्मिळ असून आता तो आणखी कमी होण्याचा अंदाज आहे.

सुमारे 10 ते 13 प्रवासी मावणाऱ्या बसची किंमतदेखील 13 टक्क्यांनी वाढणार आहे. परंतु, व्यावसायिक वाहनांच्या किंमती सुमारे 2 टक्क्यांनी तर तीनचाकी वाहनांच्या किंमतीत एक टक्का कपात होण्याचा अंदाज आहे.

 दुचाकी वाहनेही स्वस्त

मोटरसायकल आणि स्कुटर्सच्या किंमतीतदेखील किमान एक हजार ते पाच हजार रुपयांची कपात होण्याचा अंदाज आहे. ज्या दुचाकी वाहनांचे इंजिन 350 सीसीपेक्षा कमी आहे त्यांच्यावरील करात 2.2 टक्क्यांची कपात होणार आहे. परंतु, 350 सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असणाऱ्या दुचाकी वाहनांवरील कर 0.8 टक्क्याने वाढणार आहे.

Web Title: 'These vehicles will be cheap after GST'