Share Market: बाजाराच्या अस्थिरतेत 'हा' शेअर देईल दमदार कमाई, तज्ज्ञांचा सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

बाजाराच्या अस्थिरतेत 'हा' शेअर देईल दमदार कमाई, तज्ज्ञांचा सल्ला

चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी यूएस सेंट्रल बँकेने व्याजदरात 75 बेसिस पॉईंट्सने वाढ केल्यानंतर आता बाजारात थोडी रिकव्हरी दिसून येत आहे. पण तरीही बाजारात चढ-उतार सुरुच असतात. बाजाराच्या याच अस्थिरतेदरम्यान तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठी मजबूत शेअरच्या शोधत असाल, तर तुम्ही बाजार तज्ञ संदीप जैन यांच्या सल्ल्याचा विचार करु शकता.

बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी खरेदीसाठी अपकोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (APCOTEX INDUSTRIES LTD) निवड केली आहे. गुरुवारी बाजारात मोठी घसरण झाली, तेव्हा हा स्टॉक हिरव्या चिन्हात होता. या कंपनीची मार्केट कॅपिटल 3100 कोटींचे आहे.

अपकोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (APCOTEX INDUSTRIES LTD)
सीएमपी (CMP) - 614.80 रुपये
टारगेट (Target) - 690 रुपये

कंपनी काय करते ?

अपकोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी 1984 मध्ये एशियन पेंट्सची एक डिव्हिजन म्हणून सुरू झाली. पण नंतर ही कंपनी वेगळी झाली. ही कंपनी सिंथेटिक रबर बनवणारी आघाडीची कंपनी आहे. रबरशी निगडीत उत्पादनांमध्ये चांगले वातावरण असून, त्याचा फायदा कंपनीला होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


कंपनीचे फंडामेंटल ?

अपकोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा  (APCOTEX INDUSTRIES LTD) स्टॉक 27 च्या PE मल्टिपलवर काम करतो. याशिवाय रिटर्न ऑन इक्विटी 28 टक्के आहे. कंपनी सुमारे 1 टक्के डिव्हिडेंड यील्ड देते. कंपनी सतत आपल्या ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनमध्ये घट करत आहे.

जून 2021 मध्ये कंपनीने 22 कोटी रुपयांचा नफा कमावला होता, तर जून 2022 मध्ये 34 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. या कंपनीत देशी-विदेशी गुंतवणूकदारांचे भागभांडवल वाढत असून त्यात सरकारचाही काही हिस्सा आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: This Share Will Give You Best Return In Share Market Crisis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..