श्रीमंतांची संपत्ती वाढता वाढे... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

मुंबई - देशात मंदी आणि महागाईचे वारे असले तरीही देशातील श्रीमंतांच्या संपत्तीवर त्याचा कोणताही फरक पडला नाही. एक हजार कोटींहून अधिक संपत्ती असलेल्या अतिश्रीमंत भारतीयांची संख्या देशात दुपटीने वाढली आहे. "बार्कलेज-हुरून इंडिया' या संस्थेने केलेल्या अहवालात 831 भारतीयांची संपत्ती एक हजार कोटींहून अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले असून सलग सात वर्षे अंबानी अव्वलस्थानी कायम आहेत. यादीतील 831 भारतीयांची एकूण संपत्ती 719 अब्ज डॉलर इतकी असून, ही रक्कम भारताच्या "जीडीपी'च्या सुमारे पाव टक्के आहे. 1 एप्रिल 2018 रोजी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तवलेल्या अंदाजानुसार 2018 च्या यादीत 306 जणांची नावे नव्याने दाखल झाली आहेत. 

देशातील सध्याच्या आर्थिक स्थितीवरून राजकीय वादविवाद होत असताना उद्योगविश्‍वात मात्र भरभराटीचे चित्र असल्याचे बार्कलेज-हुरून इंडियाच्या यादीवरून दिसून येते. एक हजार कोटींहून अधिक संपत्ती असलेल्या भारतीयांची संख्या दोन वर्षांत दुपटीने वाढल्याचे "बार्कलेज-हुरून इंडिया'चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद यांनी सांगितले. ते म्हणाले, की 2016 मध्ये 339 जणांकडे एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती होती. 2018 मध्ये हीच संख्या 831 वर पोहोचली. 

मुंबई कोट्यधीशांचे शहर 
मुंबईने कोट्यधीशांच्या यादीत बाजी मारली असून येथील 233 जण सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत आहेत. त्यापाठोपाठ दिल्लीचा आणि बेंगळूरुचा क्रमांक लागतो. तेथे अनुक्रमे 163 आणि 70 जणांची नावे श्रीमंतांच्या यादीत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousand million more than doubled in the country has increased the number of Indians