म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी करा पाच गोष्टींचे नियोजन 

टीम ई-सकाळ
Friday, 13 December 2019

तुमचे विम्याचे कवच किती भक्कम आहे. हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं सुरुवात त्यापासूनच करावी लागते. पण, गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराकडून योग्य मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. 

हल्ली प्रत्येकजण चांगल्या गुंतवणुकीचे पर्याय शोधत असताना दिसत आहे. त्यात शेअर बाजार, म्युच्युअल फंड अशा अनेक पर्यायांकडे अनेकांचा ओढा असतो. पण, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याबरोबरच विमा कवच घेणे आवश्यक आहे. अर्थात गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली तर, निश्चितच फायदा होणार आहे. इथं आम्ही तुम्हाला गुंतवणूक करण्यापूर्वीच्या पाच महत्त्वाच्या गोष्टींची माहिती देत आहोत. तुमचे विम्याचे कवच किती भक्कम आहे. हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं सुरुवात त्यापासूनच करावी लागते. पण, गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराकडून योग्य मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आरोग्य विमा 
तुमचे कुटूंब जर आर्थिकदृष्ट्या तुमच्यावर अवलंबून असेल तर, तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा करणे आवश्यक आहे. विशेषतः तरूण गुंतवणुकदारांना, प्रत्येकाला आरोग्य विमा असणे आवश्यक आहे. आजारपणाच्या काळात व त्यानंतर काही महिने गुंतवणुकीच्या योजनांवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळं आरोग्य विम्याचं नियोज तुम्ही केलंच पाहिजे.

Image result for mediclaim

गेल्या काही वर्षांपासून आरोग्य सेवे मध्ये खर्च वाढत चालले आहेत. तुमच्या नोकरीच्या ठिकाणी जर तुम्ही तुमचा आरोग्य विमा काढला असेल तर, तुम्ही अडचणीत आहात. कारण नोकरी सोडल्यानंतर आरोग्य विमाही सोडावा लागेल. त्यामुळे तुम्ही तुमचा वेगळा आरोग्य विमा काढून घ्यायला हवा.

अर्थविश्व क्षेत्रातील बातम्यांसाठी क्लिक करा या लिंकवर

जीवन विमा
जीवन विमा हा आरोग्य विम्या ऐवढा आवश्यक नाही. परंतु, तुमच्यावर आर्थिकदृष्ट्या कोणी अवलंबून असेल, तर मात्र तुम्ही जीवन विमा नक्कीच काढायला हवा. जीवन विमा विकत घेताना तो मुदतीचा असेल, म्हणजे 'पियॉर टर्म इन्शुरन्स', असेल याची काळजी घ्या. कोणत्याही सावधी विमा योजना अथवा युनिट संलग्न विमा योजना म्हणजेच अश्या विमा योजना ज्या मध्ये बचत आणि गुंतवणूक वैशिष्टे असतील, अश्या विमा योजना घेणे टाळा. पियॉर टर्म इन्शुरन्स हे इतर विमा योजनांपेक्षा खूपच स्वस्त असतात ज्यामुळे तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये सर्वाधिक सरंक्षण मिळते.

एमर्जन्सीसाठी तयारीत राहा?
आपत्कालीन परिस्थितीसाठी किंवा नोकरीतील अडचणीच्या वेळेसाठी तुमच्याकडे रोख रक्क्म आहे का? तुमचे कुटुंब तुम्हाला आर्थिक  मदत करू शकते का? उत्तर 'नाही' असेल तर, तुम्हाला रोख रक्कम तयार ठेवली पाहिजे. ज्याने तुम्हाला पुढे अडचणी येणार नाहीत. नोकरी नसेल तरी, सहा महिने रक्कम टिकेल ऐवढी रोख रक्कम तुमच्याकडे हवी किंवा तुमच्या बँकेत हवी.  काही व्यक्ती आपत्कालीन परिस्तिथीसाठी आर्बिट्राज फंडस् किंवा अल्ट्रा शॉर्ट डुरेशन स्कीममध्ये गुंतवतात.

अर्थविश्व क्षेत्रातील बातम्यांसाठी क्लिक करा या लिंकवर

वेगळ्याप्रकारे सुरवात करा
पारंपारिक पद्धतीनुसार गुंणतवणुकीच्या उद्देशाने विमा योजनेमध्ये गुंणतवू नका. नेहमी लक्षात ठेवा, विमा योजनांपासून मुक्त होणे सोपे नाही. टर्म इन्शुरन्स व्यतिरिक्त दुसरी कोणतेही इन्शुरन्स प्लॅनचे बळी पडू नका. कोणत्याही इन्शुरन्स प्लॅनमधून बाहेर पडणे सोपे नाही. त्यामुळे खूप जास्त आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्या मुळे प्लॅन निवडताना काळजी पूर्वक निवडा.

Image result for mutual funds girl

म्युच्युअल फंडा संदर्भात मुलभूत गोष्टी लक्षात घ्या
आपल्याकडे असलेला वेळ व जोखीम घेण्याची तयारी या नुसार म्युचल फंडची निवड करा. आपली उद्दीष्ट्ये तीन चार वर्षांत पूर्ण करायची असल्यास बँक ठेव व म्युचल फंड कर्जावर टिकून राहा. जास्त कालावधीच्या म्युचल फंडसाठी इक्विटी म्युच्युअल फंडचा विचार करू शकता. तुमची धोका पत्करण्याची पात्रता जाणून घेण्यासाठी ऑनलाईन क्विझ सोडवा. ज्या मुळे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक चांगल्या प्रकारे करू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tips before investing in mutual funds marathi information