टाटांच्या 'टायटन'ला 'गुड टाइम'

वृत्तसंस्था | Tuesday, 6 August 2019

टाटा समूहातील कंपनी असलेल्या 'टायटन'ला 'गुड टाइम' आल्याचे दिसते आहे. 

मुंबई: टाटा समूहातील आघाडीची कंपनी, 'टायटन'ला जूनअखेर 370.73 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीतील नफ्याशी तुलना करता कंपनीच्या नफ्यात 6 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील याच कालावधीत कंपनीने 349.17 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. या कालावधीत कंपनीचा एकूण महसूल 14.72 टक्क्यांनी वाढून 4,354.52 कोटी रुपयांवरून 4,995.64 कोटी रुपयांवर पोचले आहे. टायटनच्या दागिन्यांच्या (तनिष्क) व्यवसायातील उत्पन्नात 13.3 टक्क्यांनी वाढ होत ते 3,572 कोटी रुपयांवरून 4,047 कोटी रुपयांवर पोचले आहे. सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचा फटका दागिन्यांच्या व्यवसायावर झाला आहे.

तर घड्याळ्यांचा व्यवसायात मात्र 20.4 टक्क्यांची दणदणीत वाढ होत 715 कोटी रुपयांवर पोचला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हा व्यवसाय 594 कोटी रुपयांचा होता. तर टायटनच्या चष्म्याच्या व्यवसायात 13.1 टक्क्यांची वाढ होत तो 149 टक्क्यांवर पोचला आहे.