आज रोख, उद्या... रोखविरहित!

गौरव मुठे
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

नरेंद्र मोदी सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सध्या चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्याने तात्पुरता चलनतुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दैनंदिन कामाच्या व्यवहारासाठी रोख पैशाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत; पण यावर उपाय आहे तो रोखविरहित व्यवहारांचा. हळूहळू आपली वाटचाल त्या दिशेनेच होत असल्याने रोखविरहित व्यवहारांचे स्वरूप प्रत्येकाने समजावून घ्यायला हवे. अशा व्यवहारांमुळे बेहिशेबी पैशाचे प्रमाण कमी होते आणि नागरिकांनाही ते फायदेशीर ठरते.

नरेंद्र मोदी सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सध्या चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्याने तात्पुरता चलनतुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दैनंदिन कामाच्या व्यवहारासाठी रोख पैशाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत; पण यावर उपाय आहे तो रोखविरहित व्यवहारांचा. हळूहळू आपली वाटचाल त्या दिशेनेच होत असल्याने रोखविरहित व्यवहारांचे स्वरूप प्रत्येकाने समजावून घ्यायला हवे. अशा व्यवहारांमुळे बेहिशेबी पैशाचे प्रमाण कमी होते आणि नागरिकांनाही ते फायदेशीर ठरते.
अनेक कंपन्यांचे ई-वॉलेटचे पर्याय उपलब्ध आहेत. "मोबाईल वॉलेट' ही संकल्पना आता आपल्याकडे रुळायला काही कालावधी लागेल. मात्र
केंद्र सरकारने पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द केल्यानंतर ई-वॉलेटची सोय देणाऱ्या अनेक कंपन्या चर्चेत आल्या. त्यामुळे "कॅशलेस' होण्यासाठी अशा "ई-वॉलेट'ची माहिती असणे आवश्‍यक आहे. अर्थशास्त्रात पैशाचे सात महत्त्वाचे गुणधर्म सांगितले आहेत. त्यामध्ये टिकाऊपणा, एकसारखेपणा, मर्यादित पुरवठा, सर्ववाहकता, विभक्तीकरण आणि सर्वमान्यता. त्यामुळे आता व्यापक विचार केल्यास "ई-मनी'पर्यंत त्यांचा विस्तार झाला आहे. ई-मनी'मध्ये देखील पैशाच्या सात महत्त्वाच्या गुणधर्मांचा समावेश आहे.

कॅशलेस होण्याचे पर्याय

  • पेटीएम : ऑनलाइन व्यवहारांसाठी, तसेच विविध प्रकारच्या बिलांचा भरणा "पेटीएम' या ई-वॉलेटच्या माध्यमातून करता येतो. याद्वारे विविध कंपन्यांचे मोबाईल रिचार्ज, विविध बिलांचा भरणा, पिक्‍चर्स बघायला जाताना त्यांचे तिकीट बुकिंग, शिवाय रेल्वेचे, विमानाचे, खासगी अथवा बसचे तिकीटदेखील आरक्षित करता येते. ई-वॉलेटमधून तुम्ही त्याचे पैसे अदा करू शकता. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नाही. उलट अंशतः सूट मिळू शकते.
  • ऑक्‍सिजन वॉलेट : ऑक्‍सिजन वॉलेटदेखील पेटीएमप्रमाणेच कार्य करते. याच्या माध्यमातून आपण पैशांच्या देवाणघेवाणीचे व्यवहारदेखील करू शकतो. शिवाय शॉपक्‍लुझ, बुक माय शो, आयआरसीटीसीमध्ये (रेल्वे) तिकीट मिळवण्यासाठी या वॉलेटचा वापर करता येतो. आपण आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून यात पैसे पाठवू शकतो.
  • फ्रीचार्च वॉलेट : या माध्यमातूनही आर्थिक व्यवहार करता येतो. प्रत्येक वॉलेट विविध प्रकारच्या ऑफर्स देते. उदा. काही ई-वॉलेट कंपन्यांच्या माध्यमातून टीव्हीचे रिचार्ज केल्यास 20 टक्के कॅशबॅक मिळतात. फ्रीचार्चप्रमाणेच "मोबिक्विक'देखील ई-वॉलेटचा पर्याय उपलब्ध आहे.

किफायतशीर खरेदीबरोबरच अप्रत्यक्षरीत्या पैसे वाचवण्याचा मार्गही या ई-वॉलेटमुळे खुला झाला आहे.

  • मोबाइल रिचार्ज करायचे असेल किंवा दुकानातून एखादी वस्तू खरेदी करायची असल्यास, तसेच रिक्षा किंवा टॅक्‍सीभाडे द्यायचे असेल या सर्वांसाठी सध्या मोबाइल वॉलेटचा पर्याय उपलब्ध आहे. ई-वॉलेट ऍपच्या माध्यमात उपलब्ध असल्यामुळे बसल्याजागी आपण विविध प्रकारची बिले ऑनलाइन भरू शकतो.
  • ई-वॉलेटद्वारे बिल भरणा किंवा तिकिटाचे आरक्षण केल्यास विविध ऑफर्स मिळतात. जसे कॅशबॅक ऑफर्स असतात. ज्यामध्ये 8 किंवा 15 दिवसांत तुम्ही केलेल्या बिलाच्या 10 टक्के, 15 टक्के किंवा कधी कधी तर 50 टक्के रक्कम तुमच्या खात्यात पुन्हा जमा केली जाते.
  • आता अनेक कंपन्यांचे विमा हप्तेही एकाच ठिकाणी ऑनलाइन भरता येणे शक्‍य झाले आहे.
  • भेट देण्यासाठी आपल्या प्रिय व्यक्तीच्या मोबाईल वॉलेटमध्ये पैसेदेखील जमा करू शकतो. मग ती व्यक्ती आपल्या वॉलेटमधील पैसे हव्या त्या पद्धतीने हवी ती वस्तू खरेदी करण्यासाठी वापरू शकते.

तरुणांना आवाहन आणि आव्हानही
आजची आधुनिक पिढी ही अधिक तंत्रज्ञानस्नेही झाली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांना विशेषत: ज्येष्ठांना रोखविरहित व्यवहारांची माहिती करून द्यावी. रोखीशिवाय व्यवहारांच्या विश्‍वासार्हतेचा मुद्दा निर्माण होतो. मात्र बिनारोखीच्या व्यवहारांमुळे फसवाफसवी कमी प्रमाणात होणार आहे. बिनरोखीच्या व्यवहारांची सुरवात ई-कॉमर्स कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात झाली. सुरवातीला ग्राहकाला फसवण्यासारख्या काही घटना घडल्या. परंतु ई-कॉमर्स पारदर्शक झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकाचा विश्‍वास बिनरोखीच्या व्यवहारांवर वाढला आहे.

ई-वॉलेटच्या माध्यमातून व्यवहार करताना कोणताही वापर शुल्क (कन्व्हिनिअन्स फी) घेतले जात नाही. त्यामुळे बऱ्याचदा लोकांच्या मनात शंका येते की, ई-वॉलेटचा वापर केल्याबद्दल मूळ बिलापेक्षा अधिक रक्कम द्यावी लागेल. मात्र बऱ्याचदा ई-वॉलेटद्वारे व्यवहार केल्यास "कॅशबॅक' मिळतो.

बऱ्याचदा ज्यांच्याकडे पैसे नसले की त्यांना गरीब म्हटले जाते. मात्र "कॅशलेस' असणे म्हणजे गरीब नव्हे. कारण आपण फक्त रोख स्वरूपात रक्कम जवळ बाळगत नसलो तरी आपल्या खात्यात ती रक्कम पडून असते. मग आपण विविध ई-वॉलेट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून आपल्याला हवी ती वस्तू आणि सेवा खरेदी करू शकतो.

Web Title: Today Cash, tommarow cash less