esakal | Gold Price: सोन्याच्या दरात तेजी, चांदीही चकाकली; जाणून घ्या आजचे दर

बोलून बातमी शोधा

gold.jpg}

सोमवारी जागतिक बाजारातील सकारात्मक घडामोडींचा परिणाम देशातील बाजारावरही झाल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली

Gold Price: सोन्याच्या दरात तेजी, चांदीही चकाकली; जाणून घ्या आजचे दर
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली- मागील आठवड्यात सोन्याचे दर बऱ्यापैकी कमी झाल्याचे दिसले होते. परंतु, सोमवारी जागतिक बाजारातील सकारात्मक घडामोडींचा परिणाम देशातील बाजारावरही झाल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली. दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी सोन्याचे भाव 241 रुपयांच्या तेजीसह 45520 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. बाजाराच्या मागील सत्रात सोने 45279 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. 

चांदीही 781 रुपयांच्या तेजीसह 68877 रुपये प्रति किलो झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1753 डॉलर प्रति औंस आणि चांदी तेजीसह 26.90 डॉलर प्रति औंसवर पोहोचली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लि. म्हणजेच आयबीजेएनुसार सोन्याचे आजचे दर पुढीलप्रमाणे आहेत. ( हे दर प्रति ग्रॅम विना जीएसटी दर आहेत.)

हेही वाचा- UPSC Success story: पहिलं MBBS केलं, नंतर IPS झाला आणि शेवटी IAS

24 कॅरेट- 4,598
22 कॅरेट-  4,441
18 कॅरेट- 3,678
14 कॅरेट- 3,057

गोल्ड फ्यूचरच्या दरातही तेजी

मागणीमुळे सटोडियांनी ताज्या व्यवहारात मोठी खरेदी केली. त्यामुळे वायदा बाजारात सोमवारी सोने 241 रुपयांच्या तेजीसह 45977 रुपये प्रति 10 ग्रॅम पोहोचले. मल्टि कमोडिटी एक्सचेंजमध्ये एप्रिल महिन्यात डिलिव्हरी मिळणाऱ्या सोन्याची किंमत 241 रुपये म्हणजेच 0.53 टक्के तेजीसह 45977 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. यामध्ये 13545 लॉटचा व्यवहार करण्या आला. 

हेही वाचा- VIDEO - पुणे पोलिस म्हणतात,'तुम्ही रोनाल्डो असलात तरी मास्क बंधनकारकच'

बाजार विश्लेषकांनी म्हटले की, व्यापाऱ्यांकडून ताजा सौद्यांच्या खरेदीमुळे सोने वायदा किंमतीत तेजी आली. व्यवहारादरम्यान आंतरराष्ट्रीय बाजार न्यूयॉर्कमध्ये सोने 1.30 टक्के तेजीसह 1751.20 प्रति औंस सुरु होता.