Gold-silver Price: सोने-चांदीच्या दरात घसरण, पहा 10 ग्रॅमचा आजचा भाव

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा सोन्यात घसरण झाल्याने आज सोने खरेदीवर जोर दिसून येईल.
Today's Gold Silver Price Updates
Today's Gold Silver Price Updatesesakal

गेल्या काही दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात स्थिरता नाही. शुक्रवारी आणि शनिवारी सलग दोन दिवस सोने-चांदीच्या भावात दरवाढ झाली होती. मात्र आज सोन्याच्या आणि चांदीच्या भाव पुन्हा घसरले. त्यामुळे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा सोन्यात घसरण झाल्याने आज सोने खरेदीवर जोर दिसून येईल. (Gold silver update 18 june 2022)

आज गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,650 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,980 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदीचा दर 610 रूपये आहे

Today's Gold Silver Price Updates
22 लाख कोटी बुडाले; बिटकॉइन 20,000 डॉलरच्या खाली

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 52,090 रुपये

दिल्ली - 52,010 रुपये

हैदराबाद - 51,980 रुपये

कोलकत्ता - 52,010 रुपये

लखनऊ - 52,160 रुपये

मुंबई - 51,980 रुपये

नागपूर - 52,030 रुपये

पूणे - 52,030 रुपये

Today's Gold Silver Price Updates
PIB फॅक्ट चेक : 15000 रुपये अन् सरकारी नोकरी; जाणून घ्या, संपूर्ण सत्य?

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Today's Gold Silver Price Updates
भारत पेट्रोलियमच्या एका प्रश्नाचं उत्तर द्या अन् मिळवा फ्री पेट्रोल

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com