Mutual Fund: 7 लार्ज कॅप म्युच्युअल फंड; दोन वर्षांत 118-126 टक्क्यांचा तगडा परतावा

कोविड-19 च्या दोन वर्षांत अनेक लार्ज कॅप फंड्सने चांगली कामगिरी केली आहे
Mutual
MutualSakal

Mutual Fund Investment: कोविड-19 च्या काळात अनेकांना बऱ्याच नुकसानीला सामोरे जावे लागले. शेअर बाजारातही (Share Market) अनेक गुंतवणुकदारांनी नुकसान होत असल्याने आपली गुंतवणूक काढून घेतली. पण याच कोविड-19 च्या दोन वर्षांत अनेक लार्ज कॅप फंड्सने चांगली कामगिरी केली आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणुदारांना श्रीमंत केले. एक नजर टाकूया अशाच काही लार्ज कॅप फंड्सवर:

1) निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड (Nippon India Large Cap Fund:)
निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंडची एयूएम 11,000 कोटी रुपये आहे. या फंडने 2 वर्षांच्या कालावधीत 126.6 टक्के परतावा दिला आहे. हा फंड जरी कोरोना कालावधीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा फंड असला तरी त्याने या कालावधीत निफ्टी 100 च्या बेंचमार्कपेक्षा कमी कामगिरी केली आहे. निफ्टी 100 ने याच कालावधीत 128.3 टक्के परतावा दिला आहे.

2) आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्लूचिप फंड (ICICI Prudential Bluechip)
या फंडची AUM 31,500 कोटी रुपये आहे. याने 2 वर्षांच्या कालावधीत 126.3 टक्के परतावा दिला आहे.

Mutual
Share Market: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर शेअर बाजार कोसळला

3) आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंड (Aditya Birla Sun Life Frontline Equity Fund)-
या फंडची AUM 21,000 कोटी रुपये आहे. याने 2 वर्षांच्या कालावधीत 124.8 टक्के परतावा दिला आहे.

4) एचडीएफसी टॉप 100 फंड (HDFC Top 100 Fund)-
या फंडने 2 वर्षांच्या कालावधीत 122.4 टक्के परतावा दिला आहे. हा फंड प्रशांत जैन करतात.

5) एसबीआय ब्लूचिप फंड (SBI BlueChip Fund)-

या फंडची एयूएम 31700 कोटी रुपये आहे. याने 2 वर्षांच्या कालावधीत 122.1 टक्के परतावा दिला आहे

Mutual
भक्कम फंडामेंटल असणारा हा स्वस्त स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओत आहे का ?

6) आयडीबीआय इंडिया टॉप 100 इक्विटी फंड (IDBI India Top 100 Equity Fund)-
या फंडने 2 वर्षांच्या कालावधीत 121.8 टक्के परतावा दिला आहे. वार्षिक आधारावर त्याचा परतावा 48.3% आहे.

7) कोटक ब्लूचिप फंड (Kotak Bluechip Fund)-
या फंडने करोना कालावधीच्या 2 वर्षांमध्ये 121.7 टक्के परतावा दिला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com