Forbesची यादी जाहीर: जाणून घ्या भारतातीत सर्वात श्रीमंत महिलांबद्दल

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 11 October 2020

देशातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी 100  अमेरिकन बिझनेस मॅगझिन फोर्ब्सने जाहीर केली आहे. भारतातील सर्वाधिक 100 श्रीमंत लोकांच्या यादीत रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी हे प्रथम स्थानी आहेत.

नवी दिल्ली: अमेरिकन बिझनेस मॅगझिन फोर्ब्स (Forbes) दरवर्षी जगभरातील श्रीमंत लोकांची यादी जाहीर करते. भारतातील सर्वाधिक 100 श्रीमंत लोकांच्या यादीत रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी हे प्रथम स्थानी आहेत. या यादीत महिलांचाही समावेश आहे. ओपी जिंदाल ग्रुपच्या सावित्री जिंदाल  (Savitri Jindal) या देशातील सर्वात श्रीमंत भारतीय महिला ठरल्या आहेत.

सर्व श्रीमंत भारतीयांच्या यादीत सावित्री जिंदाल या 19व्या क्रमांकावर असून भारतीय श्रीमंत महिलांमध्ये जिंदाल यांनी प्रथम स्थान पटकावले आहे. सावित्री जिंदाल या ओपी जिंदाल ग्रुपच्या  (OP Jindal Group) प्रमुख आहेत. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये त्यांची संपत्ती 13.8 टक्क्यांनी वाढून 42 हजार 415 कोटी रुपये झाली आहे. जिंदाल समूह स्टील, पॉवर, सिमेंट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात काम करतो.

 

 

किरण मजुमदार शॉ - फोर्ब्सच्या यादीनुसार श्रीमंत भारतीय महिलांच्या यादीत समावेश झालेल्या किरण मजुमदार शॉ यांची संपत्ती मागील वर्षभरात सर्वात वेगाने वाढली आहे. किरण मजुमदार शॉ या सावित्री जिंदाल यांच्यानंतर दुसऱ्या भारतीय श्रीमंत महिला ठरल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांची संपत्ती 93.28 टक्क्यांनी वाढून 33 हजार 639 कोटी रुपये झाली आहे. त्यांच्या संपत्तीतील ही सर्वात वेगवान असून ती वाढ केवळ स्त्रियांच्या श्रेणीतच नव्हे तर पहिल्या 100 श्रीमंत भारतीयांमध्ये सर्वाधिक आहे.  किरण मजुमदार शॉ बायोकॉन या बायोटेक कंपनीचे अध्यक्ष आणि एमडी आहेत. त्या आयआयएम बेंगळुरूच्या अध्यक्षही आहेत. त्याची कंपनी मधुमेह आणि कर्करोगासारख्या रोगांसाठी इन्सुलिन ची निर्मिती करते. त्यांना ईवाय वर्ल्ड  एंटरप्रेन्योर ऑफ द इयर 2020 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

विनोद राय गुप्ता - विनोद राय गुप्ता या भारतातील पहिल्या पाच श्रीमंत महिलांमध्ये एकमेव आहेत ज्यांच्या संपत्तीत घट दिसून आली आहे. तरीदेखील श्रीमंत भारतीयांच्या यादीत त्या अजूनही 40 व्या आणि श्रीमंत भारतीय महिलांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत त्यांची संपत्तीत 3 हजार 291 कोटींची घट होऊन 25 हजार 961 कोटी रुपयांवर आली आहे. विनोद राय गुप्ता (Vinod Rai Gupta) या हॅवल्स इंडियाच्या प्रमुख आहेत. ही कंपनी पंखे, फ्रीज आणि वॉशिंग मशीन तसेच इलेक्ट्रिकल आणि लायटिंगच्या वस्तू तयार करते. विनोद राय गुप्ता यांचे पती कीमत राय गुप्ता यांनी 1958 मध्ये इलेक्ट्रॉनिक व्यापार व्यवसाय म्हणून हवेल्सची स्थापना केली होती. सध्या कंपनीचे जगभरात 12 कारखाने असून कंपनी 40 देशांमध्ये व्यवसाय करत आहे.

RBI Policy: चौथ्या तिमाहीपर्यंत देशाचा जीडीपी दर पॉझिटिव्ह होण्याची आशा

 

Forbes India Rich List 2020: Meet India's wealthiest women | Forbes India |  Page 3

 

लीना तिवारी - फोर्ब्सनुसार लीना तिवारी भारतातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. 2019 मध्ये त्यांची संपत्ती 14,041 कोटी रुपये होती जी 2020 मध्ये 21,939 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. वर्षभरात त्यांची संपत्ती सुमारे 56.25 टक्क्यांनी वाढली आहे. लीना तिवारी यूएसव्ही इंडियाच्या प्रमुख आहेत. यूएसव्ही इंडियाची सुरुवात लीना तिवारी  (Leena Tiwari) यांचे वडील विठ्ठल गांधी यांनी 1961 मध्ये केली होती. ही कंपनी मधुमेह आणि हृदयाच्या औषधांची निर्मिती करते. 2018 मध्ये कंपनीने जर्मन जेनेरिक औषध उत्पादक जुटा फार्मा विकत घेतली आहे.

Leena Tewari-Random Reading) - INDIA New England News

 

सर्वसामान्यांसाठी खूशखबर! सरकार आणतंय 'ग्रीन रेशन कार्ड'

मल्लिका श्रीनिवासन - देशातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत मल्लिका श्रीनिवासन या पाचव्या स्थानावर आहेत. जगातील तिसरी आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च ट्रॅक्टर बनवणारी कंपनी इसा मल्लिका श्रीनिवासन, ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेडच्या चेअरमन इसा मल्लिका श्रीनिवासन देशातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत 58 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची मालमत्ता 17 हजार 917 कोटी रुपये आहे.

Mallika Srinivasan Biography, Details, Net Worth, and Awards | Aaj Ki Naari

ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड कंपनी दरवर्षी 15 लाख ट्रॅक्टर विकते. तसेच ही कंपनी 100 हून अधिक देशांमध्ये व्यवसाय करते. ही कंपनी अमेरिकेच्या ट्रॅक्टर आणि कृषी अवजार उत्पादक कंपनीचा भागधारकही आहे. भारत सरकारनेही मल्लिका श्रीनिवासन (Mallika Srinivasan) यांनी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: top five indian rich female in forbes list