इराणमध्ये “टोटल’ करणार 4.8 अब्ज डॉलर गुंतवणूक

वृत्तसंस्था
सोमवार, 3 जुलै 2017

निर्बंध उठवल्यानंतर सर्वांत मोठा करार

तेहरान : फ्रान्समधील ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या टोटल कंपनीने इराणमध्ये नैसर्गिक वायू क्षेत्र विकसित करण्यासाठी 4.8 अब्ज डॉलरचा करार करणार आहे.

निर्बंध उठवल्यानंतर सर्वांत मोठा करार

तेहरान : फ्रान्समधील ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या टोटल कंपनीने इराणमध्ये नैसर्गिक वायू क्षेत्र विकसित करण्यासाठी 4.8 अब्ज डॉलरचा करार करणार आहे.

इराणच्या नागरी आण्विक कार्यक्रमामुळे टाकण्यात आलेले निर्बंध आंतरराष्ट्रीय समुदायाने उठविल्यानंतर पहिल्यांदाच एवढा मोठा करार विदेशी कंपनीकडून होत आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे, की देशातील पर्शियाच्या आखातातील साऊथ पार्स या नैसर्गिक वायू क्षेत्राचा अकरावा टप्पा विकसित करण्यात येणार आहेत. याबाबत इराणचे पेट्रोलियम मंत्रालय, टोटल कंपनीचे व्यवस्थापक, चीनमधील चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि इराणमधील पेट्रोपार्स या कंपन्यांमधे हा करार होणार आहे. या करारावर स्वाक्षरी सोमवारी होईल.

इराणवर आंतरराष्ट्रीय निर्बंध लादण्याआधी 2006 पर्यंत देशात गुंतवणूक करण्यात टोटक कंपनी आघाडीवर होती. निर्बंध उठविण्यात आल्यानंतर आता टोटलने इराणमध्ये पुनरागमन केले आहे. तेल उत्पादक देशांची संघटना "ओपेक'चा सदस्य असलेला इराण हा तिसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे.

Web Title: 'Total' will invest $ 4.8 billion in Iran