व्यापारी तूट एप्रिलमध्ये 13.72 अब्ज डॉलरवर   

वृत्तसंस्था
बुधवार, 16 मे 2018

नवी दिल्ली - निर्यातीत एप्रिलमध्ये ५.१७ टक्के वाढ होऊन ती २५.९१ अब्ज डॉलरवर पोचली असून, आयातीतही ४.६० टक्के वाढ होऊन ती ३९.६३ अब्ज डॉलरवर गेली आहे. यामुळे व्यापारी तूट १३.७२ अब्ज डॉलरवर पोचली आहे.  मागील वर्षातील एप्रिलच्या तुलनेत या वर्षी एप्रिलमध्ये कच्च्या तेलाची आयात ४१.५ टक्‍क्‍याने वाढली आहे.

एप्रिलमध्ये कच्च्या तेलाची आयात १०.४१ अब्ज डॉलर आहे. बिगरतेल आयातीत ४.३ टक्के घसरण होऊन ती २९.२१ अब्ज डॉलर आहे. अभियांत्रिकी, रसायने आणि औषधे या क्षेत्रातील निर्यात अनुक्रमे १७.६३, ३८.४८ आणि १३.५६ टक्के वाढली आहे. याचवेळी पेट्रोलियम उत्पादने, कार्पेट, रत्ने व दागिने आणि लोहखनिजाची निर्यात घसरली आहे. सोन्याची आयात एप्रिलमध्ये ३३ टक्‍क्‍याने कमी होऊन २.५८ अब्ज डॉलरवर आली. मार्चमध्ये निर्यातीत ०.६६ टक्के घसरण होऊन ती २९.११ अब्ज डॉलरवर आली होती.

Web Title: Trade deficit during April was $ 13.72 billion

टॅग्स