"एचडीआयएल'च्या दोन संचालकांना अटक 

पीटीआय
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

पंजाब अँड महाराष्ट्र बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणी "हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड' (एचडीआयएल) या स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपनीच्या दोन संचालकांना गुरुवारी मुंबई पोलिसांनी अटक केली, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणी "हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड' (एचडीआयएल) या स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपनीच्या दोन संचालकांना गुरुवारी मुंबई पोलिसांनी अटक केली, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

या कंपनीच्या बुडीत कर्जप्रकरणातील आरोपी राकेश वाधवा आणि आणि त्यांचे पुत्र सारंग वाधवा यांना आर्थिक गुन्हे विभागाने (ईओडब्ल्यू) अटक केली. "एचडीआयएल'ची तीन हजार 500 कोटींची मालमत्ता "ईओडब्ल्यू'ने गोठवली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two directors of HDIL arrested