'उबर'चे सीईओ ट्रॅव्हिस कॅलनिक यांचा राजीनामा

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जून 2017

महिला कर्मचाऱ्यांकडून वरिष्ठांवर करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे ट्रॅव्हिस हे अचानकपणे सुट्टीवर गेले होते. त्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला होता

न्यूयॉर्क: वादाच्या भोवऱ्यात सापडलेले उबर कंपनीचे सीईओ आणि संस्थापक ट्रॅव्हिस कॅलनिक यांनी अखेर राजीनामा दिला आहे. गुंतवणूकदारांच्या वाढत्या दबावामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे. महिला कर्मचाऱ्यांकडून वरिष्ठांवर करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे ट्रॅव्हिस हे अचानकपणे सुट्टीवर गेले होते. त्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला होता.

अमेरिकेतील वृत्तपत्र असलेल्या न्यूयार्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उबर कंपनीचे सीईओ ट्रॅव्हिस कॅलनिक यांनी राजीनामा दिला असून त्यांनी कंपनीला 'राम-राम' ठोकला आहे. ट्रॅव्हिस यांच्याबरोबर त्यांच्या आणखी एका निकटवर्तीयाची नोकरी जाण्याची शक्यता आहे.

न्यूयार्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उबर कंपनीतील सध्याचे वातावरण बिघडले होते, त्यामुळे ट्रॅव्हिस यांच्या नेतृत्त्वाविषयी शंका उपस्थित करण्यात आली होती.

Web Title: Uber CEO Travis Kalanick resigns