देशातील लॉकडाउनचा परिणाम; बेरोजगारीदर 27.1 टक्‍क्‍यांवर 

वृत्तसंस्था
Tuesday, 5 May 2020

देशातील बेरोजगारीचा दर 3 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 27.1 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. त्याआधीच्या आठवड्यात तो 21.1 टक्के होता. आगामी काळात बेरोजगारीचा दर आणखी वाढण्याची शक्‍यता व्यक्त होत आह.

नवी दिल्ली - देशातील बेरोजगारीचा दर 3 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 27.1 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. त्याआधीच्या आठवड्यात तो 21.1 टक्के होता. आगामी काळात बेरोजगारीचा दर आणखी वाढण्याची शक्‍यता व्यक्त होत आह. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात सध्या लॉकडाऊन आहे. यामुळे बहुतांश उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. याचा मोठ्या प्रमाणात रोजगाराला फटका बसला आहे. यामुळे एप्रिलअखेर आणि मे महिन्याच्या पहिल्या तीन दिवसात बेरोजगारीदर वाढला आहे. आता लॉकडाउन 17 मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात रोजगारावर त्याचा आणखी विपरित परिणाम होणार आहे, अशी माहिती "सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी'चे (सीएमआयई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी दिली आहे. 

- कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशातील रोजगार दर फेब्रुवारी महिन्यात 40 टक्के होता. तो एप्रिल महिन्यात घसरून 23.5 टक्‍क्‍यांवर आला होता. गेल्या काही आठवड्यांच्या आकडेवारीवरून यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. देशातील 14 कोटी नागरिकांनी लॉकडाउनच्या कालावधीत रोजगार गमावावा लागण्याची शक्‍यता आहे. लॉकडाउनच्या कालावधीत आणखी वाढ झाल्यास रोजगाराची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्‍यता आहे. शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागात नागरिकांनी रोजगार गमावला आहे. बहुतांश स्टार्टअप कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे. देशातील 2 हजार 800 आयटी कंपन्यांची शिखर संघटना असलेल्या "नॅसकॉम'नेही मोठ्या प्रमाणावर नोकरकपातीचे संकेत दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unemployment rises to 27.1 percent impact of the country lockdown