हलवा बनविण्याच्या कार्यक्रमानंतर, अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात

union budget 2020 printing starts after halwa ceremony
union budget 2020 printing starts after halwa ceremony

नवी दिल्ली :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नॉर्थ ब्लॉकमध्ये हलवा बनविण्याचा कार्यक्रम पार पडून 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात केली. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ही परंपरा पाळली जाते. सीतारामन यांच्याबरोबरच अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर, अर्थखात्यातील वरिष्ठ तसेच कनिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हलव्याचा स्वाद घेत कामाला सुरुवात केली.

गोड पदार्थ खाऊन सुरुवात
प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पाच्या छपाईआधी अर्थमंत्रालयामध्ये मोठ्या कढईत हलवा बनविला जातो. वर्षानूवर्षे ही पद्धत सुरू आहे. चांगल्या कामाला प्रारंभ म्हणून गोड पदार्थ खाऊन सुरुवात केली जाते. त्यामुळे हलवा बनविण्याची प्रथा आहे. महत्वाचे म्हणजे, नॉर्थब्लॉक येथे होणाऱ्या छपाईच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प तयार करण्यात सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्प सादर होईपर्यंत अर्थमंत्रालयातून बाहेर पडता येत नाही. तसेच, कुटुंबीयांशी फोन, इमेल किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून संपर्क करता येत नाही. साधारणत: 10 दिवसांसाठी हे सर्व कर्मचारी येथेच मुक्कामाला असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com