केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली येत्या 1 फेब्रुवारी अर्थसंकल्प सादर करणार आहे. तसेच आर्थिक वर्ष 2018-19 चे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारी ते 6 एप्रिलदरम्यान दोन टप्प्यात घेतले जाणार आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली येत्या 1 फेब्रुवारी अर्थसंकल्प सादर करणार आहे. तसेच आर्थिक वर्ष 2018-19 चे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारी ते 6 एप्रिलदरम्यान दोन टप्प्यात घेतले जाणार आहे. अतिरिक्त खर्चाच्या माध्यमातून आर्थिक वाढीला चालना देण्याच्या उद्देशाने 1 फेब्रुवारी अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी सांगितले.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारी रोजी सुरू होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद राज्यसभा आणि लोकसभेच्या संयुक्त अधिवेशनाला मार्गदर्शन करतील. तसेच 31 जानेवारी रोजी आर्थिक पाहणी (इकॉनॉमिक सर्व्हे) सादर केला जाण्याची शक्यता आहे. यंदाचे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा 29 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान तर दुसरा टप्पा 5 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे, अशी माहिती अनंतकुमार यांनी दिली.

दरवर्षी 28 फेब्रुवारीरोजी अर्थसंकल्प सादर केला जात होता आणि त्यानंतर रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला असतो. मात्र नवे आर्थिक वर्ष एक एप्रिलपासून सुरू होते. तेव्हापासूनच प्रस्ताव राबवता यावेत, यासाठी अर्थसंकल्प महिनाभर आधीच सादर जाणार आहे. शिवाय स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्याची 50 वर्षांपासूनची परंपराही रद्द करण्यात आली आहे. आता रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर न केला जाता केंद्रीय अर्थसंकल्पात सादर करण्यात येतो.

Web Title: Union Budget On Feb 1