आरबीआयच्या नव्या गव्हर्नरची घोषणा लवकरच : अर्थसचिव

Sakal | Tuesday, 11 December 2018

नवी दिल्ली: केंद्र सरकार उर्जित पटेलांच्या जागी नेमल्या जाणाऱ्या नव्या गव्हर्नरची घोषणा लवरकच करेल अशी माहिती अर्थसचिव ए एन झा यांनी दिली आहे. उर्जित पटेलांनी तटकाफडकी राजीनाम्यामुळे सध्या आरबीआयचे गव्हर्नरपद रिक्त आहे. 1990 नंतर आपला कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच पायउतार होणार उर्जित पटेल हे पहिलेच आरबीआय गव्हर्नर आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाची केंद्र सरकारबरोबरील अनेक मतभेदांच्या मुद्द्यांसंदर्भात चर्चा करण्यासंबंधीची बैठक चार दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच पटेलांनी राजीनामा दिला आहे. 

सध्या गव्हर्नरपद रिक्त असल्यामुळे ही बैठक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. उर्जित पटेलांचा तीन वर्षांचा कार्यकाळ सप्टेंबर 2019 मध्ये संपणार होता. याआधीच्या इतर आरबीआय गव्हर्नरप्रमाणेच उर्जित पटेलदेखील मुदतवाढीसाठी पात्र होते. पटेलांची जानेवारी 2013 मध्ये आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदावर नियुक्ती झाली होती.