फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 मार्च 2018

फेडरल रिझर्व्हकडून दर वाढ करण्याची ही सलग सहावी वेळ आहे. "आम्हाला अपेक्षित असलेल्या पद्धतीनेच सध्या अर्थव्यवस्थेची प्रगती सुरू आहे,' असे फेडरल रिझर्व्हकडून सांगण्यात आले.

वॉशिंग्टन : फेडरल रिझर्व्हने व्याजदर पुन्हा एकदा वाढविले आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेला प्राप्त झालेले स्थैर्य, रोजगार आणि गुंतवणुकीतील वाढ आणि महागाई नियंत्रणात येत असल्याने हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. या दरवाढीने फेडरल फंड्‌स रेट 1.5 ते 1.75 टक्‍क्‍यांदरम्यान आला आहे.

फेडरल रिझर्व्हकडून दर वाढ करण्याची ही सलग सहावी वेळ आहे. "आम्हाला अपेक्षित असलेल्या पद्धतीनेच सध्या अर्थव्यवस्थेची प्रगती सुरू आहे,' असे फेडरल रिझर्व्हकडून सांगण्यात आले.

 दरवाढीच्या घोषणेला जगभरातील शेअर बाजारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अमेरिकी शेअर बाजारातील "एस अँड पी 500' निर्देशांकाने 200 अंशांनी उसळी घेतली आहे. वॉल स्ट्रीटवरील गुंतवणूकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास वाढल्याने शेअर बाजारातील वाढ कायम असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Web Title: US Federal Reserve hikes rates and raises GDP