एअर इंडियाकडून "टॅक्‍सीबोट'चा वापर

एअर इंडियाकडून "टॅक्‍सीबोट'चा वापर

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील एअर इंडियाने इंधनाची बचत करण्याच्या दृष्टीने "टॅक्‍सीबोट' (टॅक्‍सींग रोबोट) वापर करण्यास सुरुवात केली आहे. "टॅक्‍सीबोट' या रोबोटच्या साह्याने विमानतळावर पार्किंग असलेली विमाने धावपट्टीवर आणली जाणार आहेत. त्यामुळे इंधन वापर कमी होणार असून पैशांची बचत होणार आहे. टॅक्‍सीबोटचा वापर करणारी एअर इंडिया ही देशातील पहिलीच विमान कंपनी ठरली आहे. 

नुकताच एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्‍विनी लोहानी यांच्या उपस्थितीत दिल्ली विमानतळावर टॅक्‍सीबोट वापराचा शुभारंभ करण्यातआला. दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झालेल्या ए-320 विमानाला धावपट्टीवर घेऊन जाण्यासाठी "टॅक्‍सीबोट'ला लोहानी यांनी झेंडा दाखवला. विमानाचे इंजिन बंद असताना "टॅक्‍सीबोट'च्या साह्याने त्याला धावपट्टीवर ओढून नेणे शक्‍य आहे. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर पार्किंग स्थळापासून धावपट्टीपर्यंत येण्यासाठी लागणाऱ्या इंधनाची बचत होईल.

टॅक्‍सीबोटमुळे जवळपास 85 टक्के इंधनाची बचत होईल, असा विश्‍वास एअर इंडियाकडून व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून एअर इंडिया कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. कंपनीचे संचालक कॅप्टन अमिताभ सिंग यांच्या नेतृत्वात टॅक्‍सीबोट वापराबाबत पुढाकार घेण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com