नऊ महिन्यात पैसे दुप्पट! राकेश झुनझुनवालांच्या पत्नीकडे 'या' कंपनीचे ५० लाख शेअर्स

या कंपनीत त्यांची ८.०४ टक्के हिस्सेदारी आहे.
Share Market
Share MarketFile Photo

मुंबई : वॉटर ट्रिटमेंट सोल्युशन्स देणाऱ्या VA Tech Wabag या कंपनीच्या शेअरची किंमत BSE वर बुधवारच्या पहिल्या सत्रात तीन टक्क्यांनी वधारून ३१७ रुपये प्रतिशेअरवर पोहोचली. ३१७ रुपये ही या कंपनीच्या शेअरची मागील २३ महिन्यांची उच्चांकी किंमत आहे. मागील चार ट्रेडींग सत्रात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल १० टक्क्यांचा परतावा दिला आहे. तुम्ही एखाद्या बँकेत जर आपले पैसे FD च्या स्वरूपात गुंतवलेत तर साधारणतः वर्षाला ५ टक्के परतावा मिळतो. मात्र, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दोन वर्षांचा इंट्रेस्ट अवघ्या ४ दिवसांत दिलेला पाहायला मिळतोय. मार्च तिमाहीत या कंपनिचा निकाल उत्तम आल्याने या शेअरमध्ये आता चांगली मजबुती पाहायला मिळते. (VA Tech Wabag money doubled in 9 months wife of rakesh zunzunwala holds 50 lac shares)

Share Market
आई-वडिलांना संसर्ग झाल्यास मिळणार देखभाल रजा; केंद्राची नवी योजना

रेखा झुनझुनवाला यांची ८.०४ टक्के हिस्सेदारी

शेअर मार्केटमधील बडे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये या कंपनीचे ५० लाख शेअर्स आहेत. त्यांची या कंपनीत ८.०४ टक्के हिस्सेदारी देखील आहे.

नऊ महिन्यात ९८ टक्क्यांची वाढ

रेखा झुनझुनवाला यांच्या या गुंतवणुकीत मागील नऊ महिन्यात ९८ टक्क्यांची वाढ झाली आहे. रेखा यांनी प्रेफरंशियल इश्यूच्या माध्यमातून या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते. कंपनीने त्यांना १६० रुपयांना एक याप्रमाणे ७५ लाख शेअर्स देऊ केले होते.

९ हजार ५०० करोड रुपयांच्या ऑर्डर्स

२०२१ च्या मार्च तिमाहीत वार्षिक आधारावर VA Tech Wabag या कंपनीचा एकूण निव्वळ नफा ५२.९ टक्के वधारून ४६.६ करोड रुपये एवढा झाला. कंपनीने आपल्या महसुलात २७.३ टक्क्यांची वाढ नोंदवली जी साधारण ९९९ कोटी रुपये एवढी नोंदवली गेली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे ९ हजार ५०० कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आधीच बुक आहेत.

कर्ज देखील कमी होतंय

अभ्यासकांच्या मते कंपनीच्या महसुलात वाढ होताना पाहायला मिळते. सोबत कंपनीवरील कर्ज देखील कमी होतंय. कंपनीची ऑर्डरबुक मजबूत असल्याने येत्या काळात कंपनीच्या महसुलात अधिक वाढ होताना पाहायला मिळेल. सरकारच्या पाण्याशी संबंधित प्रकल्पांवर जोर दिल्याने कंपनीला अधिकचा फायदा होऊ शकतो.

(नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com