मार्चमध्ये वाहनविक्रीत  45 टक्‍क्‍यांची घट 

वृत्तसंस्था
Tuesday, 14 April 2020

25 मार्चपासून लॉकडाऊनमुळे देशातील सर्व उत्पादन प्रकल्प आणि वाहनांचे शोरूम बंद आहेत.याचा परिणाम वाहनांच्या विक्रीवर झाला आहे.मार्चमध्ये सुमारे दहा लाख वाहनांची विक्री.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूंच्या संकटामुळे देशभर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. मार्चमध्ये वाहनांच्या विक्रीत 45 टक्‍क्‍यांची घट नोंदवण्यात आली आहे. मार्चमध्ये सुमारे दहा लाख वाहनांची विक्री नोंदवण्यात आली आहे. मात्र, 25 मार्चपासून लॉकडाऊनमुळे देशातील सर्व उत्पादन प्रकल्प आणि वाहनांचे शोरूम बंद आहेत. याचा परिणाम वाहनांच्या विक्रीवर झाला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ट्रक आणि बसच्या विक्रीत तब्बल 88 टक्‍क्‍यांची घट झाली आहे. फक्त 13 हजार 27 ट्रक आणि बसची विक्री या कालावधीत झाली आहे. तर दुचाकी वाहनांच्या विक्रीत 40 टक्‍क्‍यांची घट नोंदवण्यात आली आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीत 51 टक्‍क्‍यांची घट होत एक लाख 43 हजार वाहनांची विक्री झाली आहे. वाहनांची विक्री नीचांकी पातळीवर पोचली आहे. मार्च महिना वाहन उत्पादन क्षेत्रासाठी सर्वाधिक आव्हानात्मक ठरला आहे. विक्रीतील घसरणीमुळे कंपन्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicle sales down 45 percent in March

Tags
टॉपिकस
Topic Tags: