esakal | नामांकित कंपन्यांच्या वाहनांना महिनाभराची वेटिंग, ऑटोमोबाईल क्षेत्र पूर्वपदावर
sakal

बोलून बातमी शोधा

Automobile

लॉकडाउनमुळे पाच ते सहा महिन्यांपासून बंद असलेले ऑटोमोबाईल क्षेत्र आता पूर्वपदावर येत आहे. दसऱ्यापासून चारचाकी आणि दुचाकीची विक्री दरवर्षी प्रमाणेच झाली आहेत.

नामांकित कंपन्यांच्या वाहनांना महिनाभराची वेटिंग, ऑटोमोबाईल क्षेत्र पूर्वपदावर

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : लॉकडाउनमुळे पाच ते सहा महिन्यांपासून बंद असलेले ऑटोमोबाईल क्षेत्र आता पूर्वपदावर येत आहे. दसऱ्यापासून चारचाकी आणि दुचाकीची विक्री दरवर्षी प्रमाणेच झाली आहेत. ऑक्टोबर महिन्यात ऑटोमोबाईलच्या विक्रीत ३० टक्क्यांनी वाढ झाली असून मागणी असलेल्या नामांकित कंपनीच्या चारचाकी वाहनास एक ते दोन महिन्यांची वेटींग आहे. यामुळे अनेकांना दिवाळीच्या मुर्हूतावरही वाहन न मिळाल्याने हिरमोड होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Diwali2020 : डिजिटल जमान्यातही खतावण्याचे महत्त्व कायम, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर होते पूजा


अनलॉक झाल्यावर वाहन विक्री सुरू झाली; मात्र प्रमाण अत्यल्प होते. सप्टेंबर महिन्यात यात वाढ झाली. तर ऑक्टोबरमध्ये वाहन बाजारात तेजी दिसून येत आहे. कारण दिवसाकाठी जिल्ह्यायातील सर्व शोरूममध्ये २० ते ३० चारचाकी व दुचाकीची बुकिंग होत आहेत. लॉकडाउन झाल्यामुळे ऑटोमोबाईल्स कंपन्यांही बंद पडल्या होत्या, अनलॉक झाल्यावर त्या सुरू झाल्या असल्या तरी, अद्यापही त्या कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. यामुळे कंपन्यांना लागणारे रॉ-मटेरियल्स मिळण्यास अडचणी येत असल्याने वाहन निर्मितीवर परिणाम जाणवत आहे.

या कारणामुळे नामांकित वाहने वेटिंगवर आहेत. ही वेटिंग अनलॉक झाल्यापासून सुरू आहेत. दसऱ्याला साडेपाचशे चाराचाकी आणि अडिच हजार दुचाकींची विक्री झाल्याचे चारचाकीचे विक्रेते विकास वाळवेकर यांनी सांगितले.तसेच बीएस-६चे तंत्रज्ञान असलेली वाहने बाजारात आले असल्याने वाहनांच्या किमतीत १० ते २० हजार रुपयांची वाढ झाली आहे. दिवाळीत सहशेहून अधिक चारचाकी तर तीन ते साडेतीन हजार दुचाकीची डिलेव्हरी होणार आहेत. यापैकी तिशेहून अधिक चारचाकीची डिलेव्हरी झाली आहेत. तर उर्वरती पाडव्याच्या दिवाशी होणार असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.