विजय मल्ल्या, नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या माहितीस नकार

Vijay-and-Nirav
Vijay-and-Nirav

नवी दिल्ली - फरारी उद्योगपती विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाविषयीचे तपशील देण्यास परराष्ट्र मंत्रालयाने नकार दिला आहे. माहिती अधिकारातील तरतुदीनुसार गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रक्रियेला बाधा होईल अशी माहिती उघड न करण्याची मुभा आहे, असे कारण मंत्रालयाने दिले आहे.

माहिती अधिकारांतर्गत मल्ल्या आणि मोदी यांच्या प्रत्यार्पणाबाबतची माहिती मागण्यात आली होती. यावर परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, की मल्ल्या आणि मोदी यांच्या प्रत्यार्पणाची विनंती ब्रिटन सरकारकडे पाठविली आहे. यावर ब्रिटनमधील यंत्रणांकडून निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. माहिती अधिकार कायद्यातील कलम ८ (१)नुसार या विनंतीची प्रत देता येणार नाही. कारण, या कलमानुसार,गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रक्रियेला बाधा येईल अशी माहिती उघड न करण्याची मुभा सरकारला आहे.

मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये जामिनावर आहे. बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा प्रमुख असलेला मल्ल्या याच्याविरुद्ध भारतीय बॅंकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. हिरे व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बॅंकेत सुमारे दोन अब्ज डॉलरचा गैरव्यवहार 
केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com