अमेरिकेतील प्रा. आचार्य RBI चे नवे डेप्युटी गव्हर्नर

वृत्तसंस्था
बुधवार, 28 डिसेंबर 2016

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी अर्थशास्त्राचे प्राध्यापक विरल आचार्य यांची नेमणूक करण्यात आली आहे. देशाचे पतधोरण निश्चित करताना आता  आर. गांधी, एस. एस. मुंदडा व एन. एस. विश्वनाथन यांच्यासमवेत आचार्य यांचादेखील सहभाग असणार आहे. ऊर्जित पटेल यांची गव्हर्नरपदी नेमणूक झाल्यानंतर रिक्त झालेल्या डेप्युटी गव्हर्नरपदी आचार्य यांची नियुक्ती झाली आहे. 

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याप्रमाणे विरल यांना शैक्षणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. न्युयॉर्क युनिव्हर्सिटी स्टर्न स्कुल ऑफ बिझनेस येथे 2008 सालापासून अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. बँका आणि वित्तीय संस्था आणि कॉर्पोरेट कर्जाचे मूल्यांकन यासारख्या विषयांमध्ये आचार्य यांनी संशोधन केले आहे. 
 
नोटाबंदीनंतर बॅंकिंग व्यवस्थेत रोकड पुरवठ्याच्या कामामध्ये बॅंकिंग व्यवस्थेवर ताण येत असून, चलनपुरवठ्याच्या कामात व्यग्र असलेल्या रिझर्व्ह बॅंकेच्या केंद्रीय मंडळावर सध्या 10 बिगरशासकीय संचालक व एका डेप्युटी गव्हर्नरचे पद रिक्त असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. 
 
Web Title: viral acharya new deputy governor of RBI