आयडिया नाव होणार इतिहास जमा; व्होडाफोनचा मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

व्होडाफोन आयडियाच्या पोस्टपेड सेवांमधून जरी आयडिया हे ब्रॅंड नाव वगळण्यात येणार असले, तरी कंपनीच्या ग्राहकांना व्होडाफोन आणि आयडिया या दोन्ही ब्रॅंडअंतर्गत सेवा मिळणे सुरूच राहणार आहे. ग्राहकांना सर्व स्टोअरवर व्होडाफोनचे रेड पोस्टपेड प्लॅन उपलब्ध होणार आहेत. शिवाय, व्होडाफोन आयडिया या दोन्ही ब्रॅंडच्या डिजिटल व्यासपीठांवरसुद्धा सर्व प्लॅन ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत.

नवी दिल्ली - दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या व्होडाफोन आयडिया आपल्या पोस्टपेड सेवांमधून "आयडिया' हे ब्रॅंड नाव वगळणार आहे. कंपनीने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

व्होडाफोन आयडियाच्या पोस्टपेड सेवांमधून जरी आयडिया हे ब्रॅंड नाव वगळण्यात येणार असले, तरी कंपनीच्या ग्राहकांना व्होडाफोन आणि आयडिया या दोन्ही ब्रॅंडअंतर्गत सेवा मिळणे सुरूच राहणार आहे. ग्राहकांना सर्व स्टोअरवर व्होडाफोनचे रेड पोस्टपेड प्लॅन उपलब्ध होणार आहेत. शिवाय, व्होडाफोन आयडिया या दोन्ही ब्रॅंडच्या डिजिटल व्यासपीठांवरसुद्धा सर्व प्लॅन ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत. कंपनीचे सध्याचे ग्राहक वापरत असलेला आयडिया निर्वाणा हा पोस्टपेड प्लॅन (जो आयडिया या ब्रॅंडकडून दिला जातो) व्होडाफोन रेड प्लॅनकडे हस्तांतरित केला जाणार आहे. तर, नवीन पोस्टपेड ग्राहकांना सुरुवातीलाच व्होडाफोन रेड या नावाने प्लॅन दिले जाणार आहेत, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर यांच्या मोबाईल व्यवसायाचे ऑगस्ट 2018 मध्ये विलीनीकरण होत व्होडाफोन आयडियाची स्थापना झाली होती. दोन्ही ब्रॅंड त्यांच्या संपूर्ण व्यवसायाची पुनर्रचना करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vodafone idea to drop Idea brand name from service