व्होडाफोन-आयडिया विलीनीकरणास मंजुरी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

नवी दिल्ली - दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी व्होडाफोन व आयडिया यांच्या विलीनीकरणास आज दूरसंचार मंत्रालयाने (डीओटी) अंतिम मंजुरी दिली. विलीनीकरणानंतर अस्तित्वात येणारी नवीन कंपनी बाजारातील ३५ टक्के हिस्सा आणि जवळपास ४३ कोटी ग्राहकांच्या जोरावर देशातील सर्वात मोठी कंपनी ठरणार आहे. दूरसंचार मंत्रालयाच्या मंजुरीनंतर या कंपन्यांना पुढील कार्यवाहीसाठी कंपनी रजिस्ट्रारशी (आरओसी) संपर्क साधावा लागणार असल्याची माहिती मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिली आहे. 

Web Title: vodafone-idea Merger Approval