मोबाईल वॉलेट्‌च्या व्यवहारांत मोठी वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

मुंबई - पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द केल्यानंतर दैनंदिन व्यवहारांसाठी स्मार्ट फोनधारकांनी मोबाईल वॉलेट्‌सचा आधार घेतला. बुधवारी (ता.९) ऑक्‍सिजन, फ्रीचार्ज, पेयू मनी, पेटीएम, सिट्रस, मोबिक्वीक यासारख्या मोबाईल वॉलेट्‌सच्या डाउनलोड्‌समध्ये सरासरी २०० टक्‍क्‍यांची वाढ नोंदवण्यात आली. 

लाखो ग्राहकांनी ऑफलाइन व्यवहारासाठी पेटीएम वॉलेटचा उपयोग केल्यामुळे पेटीएमच्या देवाण-घेवाणीत ४३५ टक्‍क्‍यांची वाढ झाली. त्याचबरोबर ॲप डाउनलोड करण्यात २०० टक्के तर एकूण व्यवहारांमध्ये २५० टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे पेटीएमच्या उपमहाव्यवस्थापक सोनिया धवन यांनी सांगितले. इतर वॉलेट्‌सलाही ग्राहकांनी प्रतिसाद दिला.

Web Title: Volet mobile activities increase