फोक्सवॅगन वाहनांच्या विक्रीत वाढ

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

पुणे : फोक्सवॅगनच्या विक्रीत ऑक्टोबर महिन्यात 70 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. सरलेल्या महिन्यात 5,534 वाहनांची विक्री करण्यात आली आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत 3,255 वाहनांची विक्री केली होती. फोक्सवॅगनच्या वाहनांमध्ये प्रदूषण उत्सर्जन चाचणी यंत्रणेत दोष आढळल्याने कंपनीची विक्री मंदावली होती. त्या तडजोडीपोटी 15.3 अब्ज डॉलरची नुकसान भरपाई द्यावी लागली होती. 

मात्र सणांच्या काळात आणि 'मेक फॉर इंडिया' अर्थातच खास भारतीयांसाठी बाजारात सादर करण्यात आलेल्या 'अॅमिओ' या सेदान गाडीमुळे कंपनीच्या विक्रीत वाढ नोंदवण्यात आली आहे. 

कमपणीच्या पुणे प्रकल्पात 'अॅमिओ'साठी रु.720 कोटींची गुंतवणूक करण्यात आली होती. शिवाय त्यासाठी सध्या 800 कर्मचारी कार्यरत आहे. कंपनीच्या पुणे प्रकल्पात तयार होणार्‍या प्रत्येक 500 वाहनांमध्ये 150 'अॅमिओ'चे उत्पादन केले जाते. 

Web Title: volks wagen sale increases