फोक्‍सवॅगन कंपनी करणार 30 हजार कर्मचारी कपात 

रॉयटर्स
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

फ्रॅंकफर्ट: फोक्‍सवॅगन कंपनी आणि कामगार संघटनांची 30 हजार कर्मचारी कपात करण्यावर सहमती झाली आहे. यामुळे कंपनीच्या खर्चात 3.9 अब्ज डॉलरची बचत होणार आहे. 

कंपनीकडून जबरदस्तीने कर्मचारी कपात होऊ नये यासाठी कामगार संघटनांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. आता कंपनी दुसऱ्या प्रकल्पांमध्ये कर्मचाऱ्यांची बदली करण्यासोबत कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय देणार आहे. तसेच, कंत्राटी कामगारांनी कमी करण्याची पावलेही उचलण्यात येणार आहेत. जर्मनीसह उत्तर अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना देशांमध्येही कर्मचारी कपात होणार आहे. जर्मनीत फोक्‍सवॅगनमध्ये 1 लाख 14 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. 

कंपनीला कामकाजावरील नफा या वर्षात 2 टक्के अपेक्षित आहे. कंपनीने उचललेल्या कर्मचारी कपातीच्या पावलामुळे हा नफा 2020 पर्यंत 4 टक्‍क्‍यांवर जाणार आहे. प्रतिस्पर्धी कंपन्या रेनॉल्ट आणि प्युजाटे सिट्रॉन यांनी 2021 पर्यंत हा नफा 6 टक्‍क्‍यांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.  

Web Title: Volkswagen to cut 30,000 jobs