फोक्‍सवॅगनला 500 कोटींचा दंड 'चीट डिव्हाइस'द्वारे फसवणूक, 'एनजीटी'चा आदेश 

फोक्‍सवॅगनला 500 कोटींचा दंड 'चीट डिव्हाइस'द्वारे फसवणूक, 'एनजीटी'चा आदेश 

नवी दिल्ली (पीटीआय) : भारतात विक्री केलेल्या डिझेलवरील मोटारगाड्यांमध्ये "फसवे यंत्र' (चीट डिव्हाइस) बसवून पर्यावरणाची हानी केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने आज जगप्रसिद्ध जर्मन मोटार उत्पादक कंपनी फोक्‍सवॅगनला 500 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. हा दंड दोन महिन्यांमध्ये जमा करण्याचे आदेश लवादाचे अध्यक्ष न्या. आदर्शकुमार गोएल यांनी दिला आहे. 

प्रदूषण चाचणीमध्ये मोटारीची बनावट कार्यक्षमता दाखविण्यासाठी इंजिनमध्ये बसविलेल्या सॉफ्टवेअरला "चीट डिव्हाइस' म्हणतात. या डिव्हाइसच्या माध्यमातून फोक्‍सवॅगनने प्रत्यक्षापेक्षा अधिक कार्यक्षमता दाखवून फसवणूक केल्याचा आरोप आहे. हरीत लवादाने नियुक्त केलेल्या समितीने फोक्‍सवॅगनला 171.34 कोटी रुपये दंडाची शिफारस केली होती. या दंडाच्या रकमेत लवादाने आज वाढ केली. आपण "बीएस-4' नियमाचा भंग केला नसून, प्रदूषण चाचणीचा अहवाल "ऑन रोड टेस्टिंग'वर आधारित होते, हा फोक्‍सवॅगन कंपनीने केलेला दावा लवादाने अमान्य केला. कंपनीला झालेल्या दंडाच्या रकमेचा विनीयोग दिल्लीतील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी वापरला जाण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com