esakal | तगडा परतावा मिळवायचाय? 'या' शेअर्सवर ठेवा बारीक नजर, होईल बक्कळ कमाई
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

तगडा परतावा मिळवायचाय? 'या' शेअर्सवर ठेवा बारीक नजर

sakal_logo
By
सुमित बागुल

मिडकॅप शेअर्समधून (Best MidCap Stocks to Invest) तगडी कमाई करू इच्छित आहात तर या शेअर्सवर नजर ठेवा. Prestige Estate, Maithan Alloys, BLS International, GNFC, Route Mobile आणि Hindustan Copper ही आही आजच्या स्टॉक्सची लिस्ट, सेठी फिनमार्टचे एमडी विकास सेठी आणि मार्केट एनालिस्ट सच्चितानंद उत्तेकरांनीहे शेअर्स निवडले आहेत.

विकास सेठींची आवड : लॉन्ग टर्म: Prestige Estate

विकास सेठींनी लॉन्ग टर्मसाठी Prestige Estate मध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. या शेअरसाठी त्यांनी 1 वर्षात 450 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. Prestige Estate रिअल इस्टेट सेक्टरमधील एक चांगली कंपनी आहे. साऊथ इंडियामध्ये कंपनीची पकड चांगली आहे. कंपनीने कायम कर्ज कमी करण्यावर भर दिला आहे, ज्याचा फायदा होतो आहे.

पोझिशनल: Maithan Alloys

विकास सेठींनी पोझिशनल पिकच्या स्वरूपात Maithan Alloys ची निवड केली आहे. यात त्यांनी 1200 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. सोबतच 1100 रुपयांवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्लाही दिला आहे. या कंपनीचा मेटल सेक्टरमधील पाया अतिशय मजबूत आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! बँक बुडाली तर 3 महिन्यातच मिळणार 5 लाखापर्यंतची रक्कम

शॉर्ट टर्म: BLS International

विकास सेठींनी शॉर्ट टर्मसाठी BLS International मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी 150 रुपयांचे लक्ष्य दिले आणि 128 रुपयांवर स्टॉप लावा असेही म्हटले आहे. ही कंपनी टेक इनेबल्स सर्व्हीस प्रोवाइड करते.

सच्चितानंद उत्तेकरांची आवड :


लॉन्ग टर्म: GNFC

सच्चितानंद उत्तेकरांनी लॉन्ग टर्मसाठी GNFC मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. स्टॉकसाठी 540 रुपयांचे लक्ष्य दिले आहे आणि विकली क्लोजिंग बेसवर 335 रुपयांना स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा: विजेअभावीही 'शाॅक' देत रुग्णांची ह्रदयक्रिया पूर्ववत करणारी 'जीवट्राॅनिक्स' स्टार्टअप

पोझिशनल: Route Mobile

सच्चितानंद उत्तेकरांनी पोझिशनल पिकच्या स्वरूपात Route Mobile ची निवड केली आहे. यात त्यांनी 2680 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. तर विकली क्लोजिंग बेसवर 2060 रुपयांवर स्टॉप लॉस लावा असे म्हटले आहे. काही दिवसांपासून स्टॉकवर डेली आणि विकली चार्टवर बुलिश पॅटर्न दिसत आहे, जो कायम राहील.

शॉर्ट टर्म: Hindustan Copper

सच्चितानंद उत्तेकरांनी शॉर्ट टर्मसाठी Hindustan Copper ची निवड केली आहे. यात त्यांनी 180 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. तर 140 रुपयांवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरल 230 रुपयांपासून 240 रुपये इतका भाव मिळू शकतो असे उत्तेकरांनी म्हटले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top