‘वेल्थ चेक-अप कॅम्प’च्या नावनोंदणीस मोठा प्रतिसाद

Sakal-Money
Sakal-Money

गुंतवणुकीच्या क्षेत्रात ‘मिस-सेलिंग’ हा अत्यंत गंभीर प्रश्‍न असून, त्याला दररोज शेकडो नागरिक बळी पडत असल्याचे तज्ज्ञांच्या चर्चेतून समोर आले आहे. बड्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीबाबतचा सल्ला देण्यासाठी खास सल्लागार असतात, पण सर्वसामान्य गुंतवणूकदारांना योग्य सल्ला देण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार भेटेलच असे नाही. म्हणूनच त्यांच्या बाबतीत ‘मिस-सेलिंग’च्या घटना जास्त प्रमाणात घडताना दिसतात. हीच बाब लक्षात घेऊन ‘सकाळ मनी’ने याबाबत महत्त्वाचे पाऊल उचलण्याचे ठरविले आहे.

ज्याप्रमाणे आपण आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘हेल्थ चेक-अप’ करून घेतो, त्याच धर्तीवर ‘वेल्थ चेक-अप’ करता येईल का, असा विचार करून नवा उपक्रम हाती घेत असल्याचे आम्ही गेल्या सोमवारी जाहीर केले होते. त्याच्या नावनोंदणीस महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे.  

सामाजिक गरज लक्षात घेऊन ‘सकाळ मनी’ने हा आगळावेगळा उपक्रम हाती घेण्याचे ठरविले असून, त्याअंतर्गत ‘सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर’ (सीएफपी) असलेली तज्ज्ञ मंडळी (थोडक्‍यात ‘वेल्थ डॉक्‍टर’) आपल्याला आर्थिक नियोजनाबद्दल; तसेच गुंतवणुकीबाबतच्या शंकांबद्दल मार्गदर्शन करतील. 

‘सकाळ मनी’चा हा उपक्रम प्रथम पुण्यात येत्या दोन फेब्रुवारी रोजी (शनिवारी) सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ‘सकाळ’च्या बुधवार पेठ कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्यांनी आधी नावनोंदणी केलेली असेल त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्यांना अजूनही नावनोंदणी करायची असेल त्यांनी ७३५०८७३५०८ या दूरध्वनी क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन ठेवावा. पुण्याबाहेरील नागरिकांसाठी भविष्यात त्यांच्या शहरांतही असाच उपक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न असेल. पुण्याबाहेरील म्हणजे मुंबई, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, सांगली, सातारा या शहरांतील ‘सीएफपीं’ना या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी ९३२२६६३२५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com