फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाआधी बाजारात किरकोळ घसरण

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

मुंबई: अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाची वाट पाहताना गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने आज(बुधवार) शेअर बाजाराची सपाट सुरुवात झाली. सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही प्रमुख निर्देशांकातील सुरुवातीची किरकोळ वाढ काही वेळातच नाहीशी झाली. परंतु निफ्टीने अद्याप 8200 अंशांच्या पलीकडे स्थान कायम राखले आहे.

सध्या(9 वाजून 29 मिनिटे) सेन्सेक्स 26,680.82 पातळीवर व्यवहार करत असून 17 अंशांनी घसरला आहे तर निफ्टी 13.40 अंशांच्या घसरणीसह 8,208.40 पातळीवर व्यवहार करत आहे. बाजारात कन्झ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि आयटी क्षेत्र सोडले असता इतर सर्व क्षेत्रांमध्ये नकारात्मक व्यवहार सुरु आहेत. या तीन क्षेत्रात किरकोळ तेजी दिसून येत आहे.

निफ्टीवर सन फार्मा, एशियन पेंट्स, भारती इन्फ्राटेल, अॅक्सिस बँक, रिलायन्सचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर कोल इंडिया, टाटा मोटर्स(डीव्हीआर), इंडसइंड बँक, टाटा मोटर्स आणि अल्ट्राटेक सिमेंट्सचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

Web Title: What Happened in the Stock Market Today