उद्यापासून 'हे' होणार स्वस्त आणि महाग?

वृत्तसंस्था
शनिवार, 31 मार्च 2018

उद्या नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. उद्यापासून (1 एप्रिल) अनेक वस्तूंच्या किंमतीमध्ये बदल होणार आहेत. जीएसटीमुळे करप्रणालीत बदल झाले आहेत त्यामुळेच अनेक वस्तूंच्या किंमतीमध्ये बदल होणार आहेत.

नवी दिल्ली : उद्या नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. उद्यापासून (1 एप्रिल) अनेक वस्तूंच्या किंमतीमध्ये बदल होणार आहेत. जीएसटीमुळे करप्रणालीत बदल झाले आहेत त्यामुळेच अनेक वस्तूंच्या किंमतीमध्ये बदल होणार आहेत. बहूतांश वस्तू या जीएसटी कौन्सिलच्याअंतर्गत येतात. मात्र काही वस्तूंची केली जाते अशा आयात केलेल्या वस्तूंना यातून वगळण्यात आले आहे. मात्र त्यावर सीमा शूल्क आकारला जातो. 

1 फेब्रुवारी 2018 रोजी सादर केल्या गेलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सीमाशुल्काच्या संदर्भात अनेक प्रस्ताव सादर करण्यात आले होते. जीएसटीच्या संदर्भातील किंमती 1 एप्रिल पासून अंमलात येतील. आयात करण्यात येणाऱ्या काही वस्तू उद्यापासून महागणार आहेत. त्या पुढीलप्रमाणे,

महाग होणाऱ्या वस्तू: 

 मोबाईल फोन, सोने, चांदी, भाजीपाला, फळांचे रस, सन ग्लासेस, नानाविध खाद्यपदार्थ, सनस्क्रिन, हात, नखे आणि पायांची निगा राखण्यासाठी लागणारी साधने, दातांची निगा राखण्यासाठी लागणारी साधने, दंतचिकित्सेसाठीची साधने आणि पॉवडर , दाढी करण्यासाठी वापरण्यात येणारे क्रिम आणि तत्सम वस्तू, डिओड्रंट, परफ्यूम्स, सेंट्स, ट्रक आणि बसचे टायर्स, रेशमी कपडे, पादत्राणे, रंगीत खडे, हिरे, इमिटेशन ज्वेलरी, स्मार्ट घड्याळे, एलईडी आणि एलसीडी टीव्ही, फर्निचर, दिवे, व्हिडीओ गेम, तीनचाकी सायकली, स्कूटर, चाकाची खेळणी, बाहूल्या, खेळणी, खेळाची साहित्य, सिगारेट, मेणबत्त्या, पतंग, खाद्य तेल

तर काही वस्तू स्वस्त होणार आहेत, त्यांची यादी पुढीलप्रमाणे,

कच्चा काजू, सोलार टेम्पर्ड ग्लास, कॉक्लियर (कानाशी संबंधित यंत्रे) प्रत्यारोपणासाठी लागणारी कच्ची सामुग्री आणि साधने आणि काही निवडक इलेक्ट्रॉनिक वस्तू

Web Title: What will be cheaper or costlier from tomorrow