टाटा समूहाच्या अध्यक्षांची 'सॅलरी' माहिती आहे का? 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

 टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना सरलेल्या आर्थिक वर्षासाठी कोट्यवधी रुपयांचे वेतन मिळाले आहे 

मुंबई: टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना सरलेल्या आर्थिक वर्षासाठी 65.25 कोटी रुपयांचे वार्षिक वेतन मिळाले आहे. यात टाटा सन्सच्या मिळालेल्या नफ्यासाठीच्या 54 कोटी रुपये कमिशनचाही मोठा हिस्सा आहे. त्याआधीच्या 2017-18 या आर्थिक वर्षापेक्षा चंद्रशेखरन यांना मिळालेल्या वेतनातील ही वाढ 19 टक्के इतकी आहे. त्या आर्थिक वर्षात चंद्रशेखरन यांना 55.11 कोटी रुपयांचे वेतन मिळाले होते. 

कार्यकारी संचालक सौरभ अग्रवाल यांचे वार्षिक वेतन 22 टक्क्यांनी वाढून 16.45 कोटी रुपयांवर पोचले आहे. त्यांनाही नफ्यासाठीच्या कमिशनपोटी 12 कोटी रुपये मिळाले आहेत. अतिरिक्त संचालक अजय पिरामल यांना कमिशनसाठी 1.9 कोटी रुपये मिळाले आहेत. इतरही संचालकांना असाच घवघवीत लाभ मिळाला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What's the salary of Tata Sons chairman N Chandrasekaran?