'व्हॉट्सअॅप' आहे 'इंडिया हेड'च्या शोधात

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 एप्रिल 2018

जागतिक पातळीवर 1.3 अब्ज युजर्स असलेल्या 'व्हॉट्सअॅप' हे मॅसेजिंग अॅप भारतातील प्रमुखाचा शोध घेत आहे. भारतात व्हॉट्सअॅपचे महिन्याकाठी 20 कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत.

 नवी दिल्ली : जागतिक पातळीवर 1.3 अब्ज युजर्स असलेल्या 'व्हॉट्सअॅप' हे मॅसेजिंग अॅप भारतातील प्रमुखाचा शोध घेत आहे. भारतात व्हॉट्सअॅपचे महिन्याकाठी 20 कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. व्हॉट्सअॅप प्रथमच भारतासाठी एका वेगळ्या प्रमुखाची निवड करीत आहे. लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपतर्फे फेब्रुवारीमध्ये 'डिजिटल पेमेंट' सेवा भारतात सुरु करण्यात आली आहे. सध्या काही मर्यादित युजर्सला याचे अपडेट्स देण्यात आले असले तरी येत्या काही दिवसांत सर्वांसाठी ही सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. 

व्हॉट्सअॅपतर्फे भारतात सातत्याने आपल्या युजर्सना नवनवे फीचर्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शिवाय भारतातील वापरकर्त्यांची संख्या अधिक असल्याने व्हॉट्सअॅपने भारतातील प्रमुख नेमण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात निवड करण्यात येणाऱ्या  व्हॉट्सअॅप प्रमुखाचे कार्यालय मुंबईत असणार आहे. शिवाय भारतातील प्रमुख हा कॅलिफोर्नियातील व्हॉट्सअॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅट आयडेमा यांच्या नेतृत्वाखाली काम करतील. 

 फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपच्या भारतातील प्रमुखपदाच्या उमेदवाराला किमान १५ वर्षांचा 'प्रॉडक्ट एक्सपिरियन्स' असणे आवश्यक आहे. शिवाय भारतात 'पेमेंट टेक्नोलॉजी'चा ५ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. 

Web Title: WhatsApp to hire India head