‘व्हॉट्‌सॲप’ स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

व्हॉट्‌सॲप भारतातील स्टार्टअप कंपन्यांमध्ये अडीच लाख डॉलरची गुंतवणूक करणार आहे. केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार (डीपीआयआयटी) विभागाच्या स्टार्टअप इंडिया कार्यक्रमाअंतर्गत व्हॉट्‌सॲप ही गुंतवणूक करणार आहे.

मुंबई - व्हॉट्‌सॲप भारतातील स्टार्टअप कंपन्यांमध्ये अडीच लाख डॉलरची गुंतवणूक करणार आहे. केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार (डीपीआयआयटी) विभागाच्या स्टार्टअप इंडिया कार्यक्रमाअंतर्गत व्हॉट्‌सॲप ही गुंतवणूक करणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

या गुंतवणूकअंतर्गत व्हॉट्‌सॲप भारतीय स्टार्टअप कंपन्यांना जाहिरातींसाठी ‘क्रेडिट’ देऊ करणार आहे. याद्वारे या जाहिरांतीवर क्‍लिक करून ग्राहकांना ‘व्हॉट्‌सॲप चॅट’वर जाऊन कंपन्यांशी संवाद साधता येणार आहे. याआधी व्हॉट्‌सॲपने स्टार्टअप इंडिया-‘व्हॉट्‌सॲप ग्रॅंड चॅलेंज’अंतर्गत पाच विजेत्यांना प्रत्येकी ५० हजार डॉलरचे (सुमारे ३५ लाख रुपये) अनुदान दिले आहे. 

व्हॉट्‌सॲप इंडियाचे अध्यक्ष अभिजीत बोस म्हणाले, ‘‘प्रभावीपणे सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणण्यात भारतीय उद्योजक आघाडीवर आहेत. स्टार्टअप आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. सध्या सामाजिक आणि आर्थिक बदलांचा भारतीय व्यावसायिकांवरदेखील मोठा परिणाम होतो आहे. अशा वेळी व्हॉट्‌सॲप त्यांना मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp plans to invest $ 2.5 million in startup