'इन्कम टॅक्स रिटर्न' भरले का? अन्यथा...

वृत्तसंस्था
Saturday, 13 July 2019

नवी दिल्ली: सरलेल्या आर्थिक वर्षासाठी (2018-19) प्राप्तिकर  विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2019 अशी आहे.  ज्यांनी अजून विवरणपत्र भरले नसेल त्यांनी ते भरण्याची त्वरा केली पाहिजे. करदात्यांनी वेळेतच प्राप्तिकर विवरणपत्र भरावे. अन्यथा त्यांना 5,000 रुयांच्या दंडाला सामोरे जावे लागेल, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने दिली आहे. ज्यांचे पगारातून मिळणारे उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यत असेल त्यांना प्राप्तिकर विवरणपत्र भरताना आता सुलभपणे भरणे शक्य होणार आहे.

नवी दिल्ली: सरलेल्या आर्थिक वर्षासाठी (2018-19) प्राप्तिकर  विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2019 अशी आहे.  ज्यांनी अजून विवरणपत्र भरले नसेल त्यांनी ते भरण्याची त्वरा केली पाहिजे. करदात्यांनी वेळेतच प्राप्तिकर विवरणपत्र भरावे. अन्यथा त्यांना 5,000 रुयांच्या दंडाला सामोरे जावे लागेल, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने दिली आहे. ज्यांचे पगारातून मिळणारे उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यत असेल त्यांना प्राप्तिकर विवरणपत्र भरताना आता सुलभपणे भरणे शक्य होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकराच्या विविध मर्यादांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 5 लाखापर्यत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. (त्यांना कलम 87 अ सूट मिळवण्याची उत्पन्न मर्यादा साडेतीन लाखांवरून पाच लाखापर्यत हंगामी अर्थसंकल्पातच वाढवण्यात आली होती.) यावेळच्या अर्थसंकल्पात देण्यात आलेली आणखी एक सुविधा म्हणजे तुम्ही पॅन कार्डऐवजी आधार कार्डद्वारेसुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता.

नोकरदारांना मोठा दिलासा; 50 लाखांपर्यत उत्पन्न असणाऱ्यांना भरावा लागणार एक पानी प्राप्तिकर फॉर्म

नोकरदारांना मोठाच दिलासा मिळणार आहे. ज्यांचे पगारातून मिळणारे उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यत असेल त्यांना प्राप्तिकर विवरणपत्र भरताना आता सुलभपणे भरणे शक्य होणार आहे. अशा व्यक्तींना आता एक पानी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2019 अशी आहे. करदात्यांनी वेळेतच प्राप्तिकर विवरणपत्र भरावे. अन्यथा त्यांना 5,000 रुयांच्या दंडाला सामोरे जावे लागेल, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When is the last day to file income tax returns?