आनंद महिंद्रांकडून 'सुपर 30'च्या खऱ्या हिरोला सलाम

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जुलै 2019

मुंबई: हृतिक रोशनचा 'सुपर 30' सिनेमा आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्याच आनंद कुमार यांच्यासंदर्भात महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे. आनंद महिंद्रा हे कायमच समाजासाठी काम अनोखे काम करणाऱ्या व्यक्तींची दाखल घेत असतात. शिवाय त्यांनी ट्विट  केल्यानंतर ते कायम 'ट्रेंड'मध्ये येते. आता महिंद्रा यांनी आनंद कुमार देणगी देऊ केली होती. मात्र आनंद कुमार यांनी दिलेली देणगी नम्रपणे नाकारली आहे. आपण दिलेली देणगी नाकारली आहे असे खुद्द महिंद्रा यांनी सांगितले आहे.

 आनंद कुमार यांनी दिलेल्या मुलाखतीत अनेक लोकांनी देऊ केलेली रक्कम मी नम्रपणे नाकारतो असे सांगितले. त्यामध्ये आनंद महिंद्रा यांचे देखील नाव घेतले. मात्र याच बातमीवर महिंद्र यांनी ट्विटवरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. कुमार यांचे 'सुपर 30' योजनेचे काम बघून प्रभावित झालेल्या महिंद्रांनी त्यांना मदत देऊ केली होती. आनंद महिंद्रा यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, आनंद यांनी मी देऊ केलेली आर्थिक मदत खरोखर नाकारली आहे. आनंद यांनी आतापर्यंत अनेकांचे आयुष्य बदलले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी स्वत:चा आणि आनंद कुमार यांचा फोटो पोस्ट केला आहे.

आनंद यांनी आतापर्यंत अनेक मोठ्या लोकांकडून आर्थिक मदत नाकारली आहे. त्यामध्ये पंतप्रधान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी देखील मदत देण्यासंदर्भात विचारण्यात आले होते. मात्र मला कोणाकडूनही पैसे घ्यायचे नाहीत. मला शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करायचे असल्याचे आनंद कुमार यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When 'Super 30' teacher said no to Anand Mahindra's offer