कोणत्या शेअर्समध्ये आज पैसे कमावण्याच्या संधी? जाणून घ्या

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे नेहमीच चांगल्या संधीच्या शोधात असतात.
Share Market
Share MarketGoogle file photo

नवी दिल्ली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे नेहमीच चांगल्या संधीच्या शोधात असतात. यासाठी आज कोणत्या शेअर्समध्ये तुम्हाला पैसे कमावण्याच्या संधी आहेत, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. (Which stocks have the opportunity to make money today Find)

बँक ऑफ बडोदा - विदेशी ब्रोकरेज फर्म CLSA च्या अंदाजानुसार 'बँक ऑफ बडोदा'च्या शेअरमध्ये येत्या सहा ते बारा महिन्यात तब्ब्ल ६० टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. CLSA च्या अभ्यासानुसार बँकेच्या कॉर्पोरेट क्रेडिट सायकलमध्ये बदल होतोय आणि बँकेने जे भांडवल जमा केला आहे. येत्या वर्षात बँकेच्या कमाईचा अनुमानित अंदाज देखील ५ टक्के अधिकचा असल्याचं म्हटलं जातंय.

झी एंटरटेनमेंट लिमिटेड (ZEEL) - झी एंटरटेनमेंट लिमिटेडचे निकाल मार्केटच्या अनुमानापेक्षा चांगले आलेले पाहायला मिळाले. कंपनीला जाहिरातीमधून मिळणाऱ्या उत्पन्नात गेल्या वर्षाच्या तुलनेत ८.९ टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळाली. कोवि नंतरच्या काळात कंपनीच्या जाहिरात उत्पन्नात स्थिरता आली तर कंपनी डिजिटल किंवा फिल्म प्रोडक्शन मध्ये पैसे गुंतवू शकते.

PNB हाऊसिंग फायनान्स - कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये झालेल्या बदलांचा कंपनीच्या शेअरवर पॉझिटिव्ह परिणाम झाला आहे. लॉन्ग टर्मसाठी हा शेअर चांगला असल्याचं शेअर मार्केटमधील गुंतवणूकदार आणि तज्ज्ञ सांगतात.

हॉटेल इंडस्ट्री - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये हॉटेल इंडस्ट्रीला चांगलाच फटका बसला आहे. अशात सरकारकडून स्टिम्युलस पॅकेज देखील येणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, या पॅकेजमध्ये हॉटेल इंडस्ट्रीचा समावेश होणार की नाही याबद्दल साशंकता असल्याने या शेअर्समध्ये फायदा होऊ शकतो.

बँकेचे शेअर्स - याबरोबरच बँकेच्या शेअर्सवर देखील नजर ठेवली पाहिजे. कारण निफ्टीच्या तुलनेत बँक निफ्टी अजूनही पिछाडीवर आहे. त्यामुळे ICICI बँक, HDFC Bank, Kotak बँक आणि SBI या बँकांच्या शेअर्सला भाव येण्याची शक्यता आहे. इथे तुम्हाला पैसे कमावण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

नोंद : शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com