घाऊक चलनवाढीत मार्चमध्ये घसरण
नवी दिल्ली : घाऊक चलनवाढीमध्ये मार्चमध्ये घसरण झाली असून, ती 5.70 टक्क्यांवर आली आहे. अन्नपदार्थांचे भाव घसरल्याने घाऊक चलनवाढ कमी झाली आहे.
नवी दिल्ली : घाऊक चलनवाढीमध्ये मार्चमध्ये घसरण झाली असून, ती 5.70 टक्क्यांवर आली आहे. अन्नपदार्थांचे भाव घसरल्याने घाऊक चलनवाढ कमी झाली आहे.
घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्लूपीआय) घाऊक चलनवाढ मोजली जाते. फेब्रुवारी महिन्यात महिन्यात ती 6.55 टक्के होती तर गेल्या वर्षी मार्च महिन्यात उणे 0.45 टक्के होती. अन्नपदार्थांच्या किंमतीत 3.12 टक्क्यांची तीव्र वाढ नोंदविण्यात आली आहे. विशेषतः भाज्यांचे भाव वाढल्याने अन्नधान्याच्या किंमती वाढल्या आहेत. फळांच्या किंमतीतदेखील 7.62 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली असून अंडी, मांस आणि मासळीच्या किंमतीत 3.12 टक्क्यांची वाढ झाली आहे. यादरम्यान, इंधनाच्या किंमतींमध्ये 18.16 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
परंतु केवळ उत्पादित वस्तूंच्या महागाईत घट नोंदविण्यात आली आहे. मार्च महिन्यात उत्पादित वस्तूंचा महागाई दर 2.99 टक्क्यांवर आला आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात हा दर 3.66 टक्के होता.
(अर्थविषयक बातम्यांसाठी क्लिक करा : sakalmoney.com )