लोकांना गृहकर्ज देणाऱ्या बँका भाड्याच्या इमारतीत का असतात?

दुसऱ्याला घर बांधण्यासाठी गृहकर्ज वाटप करणारी बँक भाड्याच्या घरातच का चालते?
Bank
BankSakal
Summary

दुसऱ्याला घर बांधण्यासाठी गृहकर्ज वाटप करणारी बँक भाड्याच्या घरातच का चालते?

स्वत:चं घर बांधणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठी अनेक जण बँकांकडून गृहकर्ज (Home Loan) घेतात. परंतु तुमच्या असे लक्षात आले असेल की, बहुतेक शहरांमध्ये बँक(Bank) भाड्याच्या इमारतींमध्ये चालतात. बँकेच्या स्वत:च्या मालकीची मालमत्ता असलेल्या फार कमी आणि फार थोड्या मोठ्या आणि क्षेत्रीय कार्यालयाच्या शाखा आहेत. त्यामुळे तुमच्या मनात प्रश्न आला असेल की, दुसऱ्याला घर बांधण्यासाठी गृहकर्ज वाटप करणारी बँक भाड्याच्या घरातच का चालते?

Bank
गृहकर्ज फेडावे, की गुंतवणूक करावी?

बँका प्रॉपर्टीच्या आधारे कर्ज देतात

अशा परिस्थितीत प्रश्न असाही निर्माण होतो की, स्वत:चं घर बांधण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणं योग्य आहे का? भारतात तुमची संपत्ती असली की त्या व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते. लोक अशा लोकांवर विश्वास ठेवतात. त्याचबरोबर बँक प्रॉपर्टीच्या आधारे कर्जही देते.

भाड्याच्या इमारतींमध्ये बँका का आहेत?

बँकेच्या धोरणात असा कोणताही नियम नाही किंवा बँक नेहमी भाड्याच्या घरातच चालवावी, असा तर्कही नाही. किंबहुना ही जुनी परंपरा कायम चालत आलेली आहे आणि बँकाही त्याचे सतत पालन करतात. सुरुवातीला बँका उघडल्यावर त्या भाड्याच्या घरात उघडण्यात आल्या, कारण प्रत्येकाला स्वतःची इमारत नव्हती. पुढे बँकांनी ती परंपरा म्हणून स्वीकारली.

Bank
गृहकर्ज घेणे झाले महाग; ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ

त्याचबरोबर कमी व्याजदराने पैसे घेऊन चढ्या दराने कर्ज देणे, ठेवीदारांच्या पैशातून कायमस्वरूपी मालमत्तेत गुंतवणूक (Investment) न करणे हे बँकेचे मुख्य कार्य आहे, हेही हेच कारण आहे. त्यामुळे बँक नेहमीच भाड्याच्या इमारतीत आपले कार्यालय उघडण्याचा प्रयत्न करते.

दुसरीकडे बँकांनी या दिशेने धोरण आखण्याची गरज आहे, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. बँका भाड्याच्या घरात चालवण्याचे कोणतेही तर्कशास्त्र नाही. भारताच्या ग्रामीण भागातही ग्रामपंचायत आणि अंगणवाडीची स्वत:ची इमारत आहे, मग बँका भाड्याच्या घरात का सुरू आहेत?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com