‘एचडीएफसी’ करणार रु.800 कोटींच्या कर्जरोख्यांची विक्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

नवी दिल्ली: गृहकर्ज क्षेत्रातील प्रमुख कंपनी एचडीएफसी दीर्घकालीन भांडवलाच्या तरतुदीसाठी 800 कोटी रुपयांच्या अपरिवर्तनीय कर्जरोख्यांची(एनसीडीज्) विक्री करणार आहे. आजपासून(ता.18) खासगी तत्त्वावर सुरक्षित विमोचनीय कर्जरोख्यांचे वाटप केले जाईल, अशी माहिती कंपनीने शेअर बाजारात सादर निवेदनात दिली आहे.

दीर्घकालीन भांडवलाच्या तरतुदीसाठी ही विक्री केली जात आहे. यातून मिळालेल्या भांडवलाचा उपयोग गृहकर्ज व्यवसायाच्या गरजा पुर्ण करण्यासाठी केला जाईल, असेही कंपनीने म्हटले आहे. या कर्जरोख्यांची मुदतपुर्ती 18 फेब्रुवारी, 202 रोजी होणार असून यावर 7.48 वार्षिक दराने व्याज देण्यात आहे. क्रिसिल आणि इक्रा या पतमापन संस्थांनी ''एएए' दर्जा दिला आहे. या कर्जरोख्यांची मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार अशा दोन्ही बाजारांमध्ये नोंदणी केली जाणार आहे.

मुंबई शेअर बाजारात एचडीएफसीचा शेअर सध्या(11 वाजून 29 मिनिटे) 1245.45 रुपयांवर व्यवहार करत असून 0.83 टक्क्याने घसरला आहे.

Web Title: Will HDFC at Rs 800 crore sales operation