'लाइटिंग' क्षेत्रात विप्रो लाइटिंगने आणली क्रांती

'लाइटिंग' क्षेत्रात विप्रो लाइटिंगने आणली क्रांती

पुणे: विप्रो लाइटिंगने नुकतेच पुण्यात आयोजित केलेया 'लाईट शो'मध्ये इंटरनेट ऑफ लाइटिंग-(आयओएल) सादर केले. कंपनीने 'लाइटिंग' क्षेत्रात आणलेल्या नवीन 'डिजिटल आणि स्मार्ट' तंत्रज्ञानामुळे घरगुती आणि औद्योगिक क्षेत्रात मोठया प्रमाणावर विजेच बचत होणार असून जीवनशैलीत आमूलाग्र बदल होणार आहेत. 

मोदी सरकारने हाती घेतलेल्या महत्त्वाकांशी 'स्मार्ट' शहरांमध्ये 'ह्यूमन सेंटरिक लाईटिंग सोल्यूशन' उपलब्ध करण्यासाठी विप्रोने आंतरराष्ट्रीय पातळीवर 'सिस्को'सारख्या कंपनीसोबत हातमिळवणी केली आहे. शिवाय स्मार्ट' तंत्रज्ञानामुळे शहरांमध्ये सार्वजनिक सुरक्षा आणि शहरातील बाह्य प्रकाशयोजनांचे नियंत्रण करता येणे शक्य आहे. 

'सकाळ'शी बोलताना विप्रो कमर्शियल लाइटिंग बिझनेसचे उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख अनुज धीर म्हणाले, विप्रो लाइटिंगचा २५ वर्षांच्या अविश्वसनीय प्रवासात आम्ही चांगल्या दर्जाची उत्पादने, सेवा आणि  नव्या संकल्पना ग्राहकांपर्यंत पोचवल्या आहेत. भविष्यात आणखी नवी उत्पादने आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना सर्वोत्तम साधने उपलब्ध करून देऊ. त्याचेच पहिले पाऊल म्हणून आम्ही आता 'इंटरनेट ऑफ लायटिंग' (एलओएल) आणले आहे. स्मार्ट आणि डिजिटल कनेक्टेड लाइटिंगमुळे विजेची बचत होणार असून लाइटिंग प्रणालीमध्ये क्रांती घडून आली आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com